S M L

बोट अपघातातून तटकरे बचावले

21 सप्टेंबरराज्याचे अर्थमंत्री सुनील तटकरे यांच्या बोटीला अपघात झाला आहे. या अपघातातून ते थोडक्यात बचावलेत. मुंबईहून अलिबागकडे जाणार्‍या पीएनपी मेरीटाईम सर्व्हिसच्या बोटीमध्ये मांडवा इथे शॉर्ट सर्कीट झाल्याने इंजीनमध्ये बिघाड झाला. यानंतर बोटीच्या खालच्या भागात आग लागली. त्यामुळे बोटीवरील प्रवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. बोटीवरील कर्मचार्‍यांनी 20 मिनीटांत आगीवर नियंत्रण मिळवले. यात एक खलाशी जखमी झाला. या बोटीवरून तटकरेंसह 70 प्रवाशी प्रवास करत होते. तटकरे यांना पोलिसांच्या बोटीने तर प्रवाशांना दुसर्‍या बोटीने किनार्‍यावर आणले गेले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 21, 2010 01:55 PM IST

बोट अपघातातून तटकरे बचावले

21 सप्टेंबर

राज्याचे अर्थमंत्री सुनील तटकरे यांच्या बोटीला अपघात झाला आहे. या अपघातातून ते थोडक्यात बचावलेत. मुंबईहून अलिबागकडे जाणार्‍या पीएनपी मेरीटाईम सर्व्हिसच्या बोटीमध्ये मांडवा इथे

शॉर्ट सर्कीट झाल्याने इंजीनमध्ये बिघाड झाला. यानंतर बोटीच्या खालच्या भागात आग लागली. त्यामुळे बोटीवरील प्रवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. बोटीवरील कर्मचार्‍यांनी 20 मिनीटांत आगीवर नियंत्रण मिळवले. यात एक खलाशी जखमी झाला.

या बोटीवरून तटकरेंसह 70 प्रवाशी प्रवास करत होते. तटकरे यांना पोलिसांच्या बोटीने तर प्रवाशांना दुसर्‍या बोटीने किनार्‍यावर आणले गेले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2010 01:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close