S M L

पुण्यात विसर्जनासाठी कडेकोट बंदोबस्त

21 सप्टेंबरगणपती विसर्जन आणि त्यानंतर येणारा अयोध्या प्रकरणाचा निकाल या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस सज्ज झाले आहेत. उद्या सकाळी साडेदहापासून पुण्यात मंडईपासून विसर्जन मिरवणूक सुरू होणार आहे. त्यानंतर मानाच्या गणपतींच्या पाठोपाठ लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता शास्त्री रस्ता आणि टिळक रस्ता या चारही रस्त्यांवरून मंडळांच्या मिरवणुका जाणार यंदा मंडळांनी मिरवणूक लवकर संपवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पुण्याच्या पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केले आहे.पोलीस, अग्निशमन दल, ऍम्ब्युलन्स आणि वायरिंग दुरुस्ती वाहनांखेरीज सर्व वाहनांना विसर्जन मिरवणुकीच्या प्रमुख रस्त्यांवर उद्या सकाळी आठपासून बंदी असेल. विसर्जन मिरवणुकीसाठी 50 वरिष्ठ अधिकारी , 130 अधिकारी आणि 6 हजार कर्मचारी तैनात असतील. याबरोबरच विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्याबाहेरचे 60 अधिकारी आणि 400 कर्मचारी यासोबतच राज्य राखीव दलाच्या 400 कंपन्याचीही मदत घेतली जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 21, 2010 02:14 PM IST

पुण्यात विसर्जनासाठी कडेकोट बंदोबस्त

21 सप्टेंबर

गणपती विसर्जन आणि त्यानंतर येणारा अयोध्या प्रकरणाचा निकाल या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस सज्ज झाले आहेत. उद्या सकाळी साडेदहापासून पुण्यात मंडईपासून विसर्जन मिरवणूक सुरू होणार आहे.

त्यानंतर मानाच्या गणपतींच्या पाठोपाठ लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता शास्त्री रस्ता आणि टिळक रस्ता या चारही रस्त्यांवरून मंडळांच्या मिरवणुका जाणार यंदा मंडळांनी मिरवणूक लवकर संपवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पुण्याच्या पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केले आहे.

पोलीस, अग्निशमन दल, ऍम्ब्युलन्स आणि वायरिंग दुरुस्ती वाहनांखेरीज सर्व वाहनांना विसर्जन मिरवणुकीच्या प्रमुख रस्त्यांवर उद्या सकाळी आठपासून बंदी असेल.

विसर्जन मिरवणुकीसाठी 50 वरिष्ठ अधिकारी , 130 अधिकारी आणि 6 हजार कर्मचारी तैनात असतील. याबरोबरच विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्याबाहेरचे 60 अधिकारी आणि 400 कर्मचारी यासोबतच राज्य राखीव दलाच्या 400 कंपन्याचीही मदत घेतली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2010 02:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close