S M L

अयोध्या निकाल लांबणीवर

23 सप्टेंबरअयोध्येतील वादग्रस्त जमिनीचा निकाल आता लांबणीवर पडला आहे. अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठात उद्या हा निकाल दिला जाणार होता. पण त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. निकाल पुढे ढकलण्यासाठी रमेशचंद्र त्रिपाठी यांनी सुप्रीम कोर्टात स्पेशल लीव्ह पीटिशन दाखल केली होती. सध्या कॉमनवेल्थ गेम्सची धामधूम सुरू आहे. कॉमनवेल्थ स्पर्धा संपेपर्यंत हा निकाल पुढे ढकलावा, तसेच कोर्टाबाहेर तडजोडीसाठी काही वेळा द्यावा, अशी विनंती त्रिपाठी यांनी याचिकेत केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती आर. व्ही. रवींद्रन आणि एच. एल. गोखले यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यांनी या याचिकेवरची पुढची सुनावणी 28 सप्टेंबरला ठेवली आहे. त्यामुळे 28 तारखेनंतरच अयोध्येच्या निकालाची तारीख कोणती, ते स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सुनावणी मोठ्या खंडपीठासमोरअयोध्या वादाच्या निकालाची तारीख ठरवण्यासाठीची सुनावणी सुप्रीम कोर्टाच्या मोठ्या खंडपीठासमोर होणार आहे. गुरूवारी ही सुनावणी न्यायमूर्ती रवींद्रन आणि न्यायमूर्ती गोखले यांच्या खंडपीठासमोर झाली. पण अयोध्येचा निकाल पुढे ढकलण्यावरुन त्यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले. निकाल 24 तारखेलाच लागावा, या मतावर न्यायमूर्ती रवींद्रन ठाम होते. तर तडजोडीसाठी निकाल पुढे ढकलण्याची भूमिका न्यायमूर्ती गोखले यांनी मांडली. या मतभेदांचा उल्लेख निकालपत्रात करताना दोन्ही न्यायमूतीर्ंनी सरन्यायाधीशांकडे मागणी केली, की या प्रकरणाची पुढील सुनावणी मोठ्या खंडपीठाकडे करावी. अयोध्येचा निकाल लांबणीवर टाकण्यासाठी रमेशचंद्र त्रिपाठी यांनी याचिका दाखल केली होती. आणि त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झालाय. कोण आहेत रमेशचंद्र त्रिपाठी ते पाहूया...त्रिपाठी हे रिटायर्ड सरकारी अधिकारी आहेत वयाच्या 15 व्या वर्षांपासून त्यांचा अयोध्या प्रकरणाशी संबंध आहेया खटल्यातील तेे 17 वे प्रतिवादी आहेत 2005 मध्ये त्यांनी या खटल्याशी संबंधित एका प्रकरणात कोर्टात साक्षसुद्धा दिली होतीत्यांची साक्ष सुन्नी वक्फ बोर्डाला खटकली होती सध्या कॉमनवेल्थ गेम्सची धामधूम आहे, त्यामुळे निकाल पुढे ढकलावा, अशी याचिका त्यांनी दाखल केली होती तसेच कोर्टाबाहेर तडजोडीसाठी वेळ द्यावा, अशीही त्यांची मागणी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 23, 2010 09:33 AM IST

अयोध्या निकाल लांबणीवर

23 सप्टेंबर

अयोध्येतील वादग्रस्त जमिनीचा निकाल आता लांबणीवर पडला आहे. अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठात उद्या हा निकाल दिला जाणार होता. पण त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.

निकाल पुढे ढकलण्यासाठी रमेशचंद्र त्रिपाठी यांनी सुप्रीम कोर्टात स्पेशल लीव्ह पीटिशन दाखल केली होती. सध्या कॉमनवेल्थ गेम्सची धामधूम सुरू आहे. कॉमनवेल्थ स्पर्धा संपेपर्यंत हा निकाल पुढे ढकलावा, तसेच कोर्टाबाहेर तडजोडीसाठी काही वेळा द्यावा, अशी विनंती त्रिपाठी यांनी याचिकेत केली होती.

त्यावर सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती आर. व्ही. रवींद्रन आणि एच. एल. गोखले यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यांनी या याचिकेवरची पुढची सुनावणी 28 सप्टेंबरला ठेवली आहे.

त्यामुळे 28 तारखेनंतरच अयोध्येच्या निकालाची तारीख कोणती, ते स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सुनावणी मोठ्या खंडपीठासमोर

अयोध्या वादाच्या निकालाची तारीख ठरवण्यासाठीची सुनावणी सुप्रीम कोर्टाच्या मोठ्या खंडपीठासमोर होणार आहे. गुरूवारी ही सुनावणी न्यायमूर्ती रवींद्रन आणि न्यायमूर्ती गोखले यांच्या खंडपीठासमोर झाली.

पण अयोध्येचा निकाल पुढे ढकलण्यावरुन त्यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले. निकाल 24 तारखेलाच लागावा, या मतावर न्यायमूर्ती रवींद्रन ठाम होते. तर तडजोडीसाठी निकाल पुढे ढकलण्याची भूमिका न्यायमूर्ती गोखले यांनी मांडली.

या मतभेदांचा उल्लेख निकालपत्रात करताना दोन्ही न्यायमूतीर्ंनी सरन्यायाधीशांकडे मागणी केली, की या प्रकरणाची पुढील सुनावणी मोठ्या खंडपीठाकडे करावी.

अयोध्येचा निकाल लांबणीवर टाकण्यासाठी रमेशचंद्र त्रिपाठी यांनी याचिका दाखल केली होती. आणि त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झालाय. कोण आहेत रमेशचंद्र त्रिपाठी ते पाहूया...

त्रिपाठी हे रिटायर्ड सरकारी अधिकारी आहेत

वयाच्या 15 व्या वर्षांपासून त्यांचा अयोध्या प्रकरणाशी संबंध आहे

या खटल्यातील तेे 17 वे प्रतिवादी आहेत

2005 मध्ये त्यांनी या खटल्याशी संबंधित एका प्रकरणात कोर्टात साक्षसुद्धा दिली होती

त्यांची साक्ष सुन्नी वक्फ बोर्डाला खटकली होती

सध्या कॉमनवेल्थ गेम्सची धामधूम आहे, त्यामुळे निकाल पुढे ढकलावा, अशी याचिका त्यांनी दाखल केली होती

तसेच कोर्टाबाहेर तडजोडीसाठी वेळ द्यावा, अशीही त्यांची मागणी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 23, 2010 09:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close