S M L

बाप्पाला अखेरचा निरोप...

23 सप्टेंबरमुंबई, पुण्यात काल सुरू झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुका आज सकाळी संपल्या. मुंबईत लाखो भक्तांनी आज आपल्या लाडक्या लालबागच्या राजाला निरोप दिला. कोळीवाड्यातील कोळी बांधवांनी राजाचे विसर्जन केले.काल सकाळी साडे दहा वाजता लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली होती. तब्बल 22 तास ही भव्य मिरवणूक चालली. आणि आज सकाळी साडे सात वाजता लालबागच्या राजाला लाखो भाविकांनी अतिशय भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.दगडूशेठ गणपतीचे विसर्जनपुण्यातही श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपतीचं विसर्जन आज सकाळी 7 वाजता करण्यात आले.पुण्यातील गणेश विसर्जनाची मिरवणूक 26 तासांनंतर संपली. त्याचबरोबर महाराष्ट्रभरातही विसर्जन शांततेत पार पडले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 23, 2010 10:53 AM IST

बाप्पाला अखेरचा निरोप...

23 सप्टेंबर

मुंबई, पुण्यात काल सुरू झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुका आज सकाळी संपल्या. मुंबईत लाखो भक्तांनी आज आपल्या लाडक्या लालबागच्या राजाला निरोप दिला. कोळीवाड्यातील कोळी बांधवांनी राजाचे विसर्जन केले.

काल सकाळी साडे दहा वाजता लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली होती. तब्बल 22 तास ही भव्य मिरवणूक चालली.

आणि आज सकाळी साडे सात वाजता लालबागच्या राजाला लाखो भाविकांनी अतिशय भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.

दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

पुण्यातही श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपतीचं विसर्जन आज सकाळी 7 वाजता करण्यात आले.

पुण्यातील गणेश विसर्जनाची मिरवणूक 26 तासांनंतर संपली.

त्याचबरोबर महाराष्ट्रभरातही विसर्जन शांततेत पार पडले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 23, 2010 10:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close