S M L

गृहमंत्रालयाकडून कॉमनवेल्थ आयोजकांना डेडलाईन

23 सप्टेंबरकॉमनवेल्थ व्हिलेज तयार आहे की नाही, या विषयीच्या अधिकृत घोषणेची जगभरातील खेळाडू वाट पाहत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने आयोजन समितीला यासाठी डेडलाईन दिली आहे. समितीने 24 तासांत स्टेडियमचे काम पूर्ण झाले पाहिजे. तर स्पर्धेसाठी बांधण्यात आलेले कॉमनवेल्थ व्हिलेजचे कामही येत्या 48 तासांत झाले पाहिजे असा इशारा गृहमंत्रालयाने दिला आहे. तर दुसरीकडे खेळाडूंनी भारतात खेळायला नकार देण्याचे प्रकार सुरुच आहेत. आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंनंतर दोन कॅनेडियन तिरंदाजांनी आपला भारत दौरा आणखी 48 तासांनी लांबवला आहे. तर यापूर्वी दोन कॅनेडियन खेळाडूंनी यापूर्वीच माघार घेतली आहे. तर न्यूझीलंडने आपले खेळाडू अजूनही भारताऐवजी सिंगापूरमध्येच ठेवणे पसंत केले आहे. दरम्यान कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनचे अध्यक्ष मायक फेनेल आज दुपारी दिल्लीत येणार आहेत. आपल्या या दौर्‍यात ते पंतप्रधानांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. तर आज दिल्ली सरकार गेम्स व्हिलेजचा ताब घेणार आहे. दरम्यान कॉमनवेल्थच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी, पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आज संध्याकाळी बैठक बोलावली आहे. क्रिडामंत्री एम. एस. गिल आणि केंद्रीय नगरविकास मंत्री जयपाल रेड्‌डी यांनाही बैठकीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 23, 2010 10:58 AM IST

गृहमंत्रालयाकडून कॉमनवेल्थ आयोजकांना डेडलाईन

23 सप्टेंबर

कॉमनवेल्थ व्हिलेज तयार आहे की नाही, या विषयीच्या अधिकृत घोषणेची जगभरातील खेळाडू वाट पाहत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने आयोजन समितीला यासाठी डेडलाईन दिली आहे.

समितीने 24 तासांत स्टेडियमचे काम पूर्ण झाले पाहिजे. तर स्पर्धेसाठी बांधण्यात आलेले कॉमनवेल्थ व्हिलेजचे कामही येत्या 48 तासांत झाले पाहिजे असा इशारा गृहमंत्रालयाने दिला आहे.

तर दुसरीकडे खेळाडूंनी भारतात खेळायला नकार देण्याचे प्रकार सुरुच आहेत. आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंनंतर दोन कॅनेडियन तिरंदाजांनी आपला भारत दौरा आणखी 48 तासांनी लांबवला आहे.

तर यापूर्वी दोन कॅनेडियन खेळाडूंनी यापूर्वीच माघार घेतली आहे. तर न्यूझीलंडने आपले खेळाडू अजूनही भारताऐवजी सिंगापूरमध्येच ठेवणे पसंत केले आहे.

दरम्यान कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनचे अध्यक्ष मायक फेनेल आज दुपारी दिल्लीत येणार आहेत. आपल्या या दौर्‍यात ते पंतप्रधानांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.

तर आज दिल्ली सरकार गेम्स व्हिलेजचा ताब घेणार आहे. दरम्यान कॉमनवेल्थच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी, पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आज संध्याकाळी बैठक बोलावली आहे.

क्रिडामंत्री एम. एस. गिल आणि केंद्रीय नगरविकास मंत्री जयपाल रेड्‌डी यांनाही बैठकीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 23, 2010 10:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close