S M L

सेझसाठी सुपीक जमिनी ठरवल्या नापीक

विनय म्हात्रे, रायगड23 सप्टेंबररायगड जिल्ह्यातील पेण अलिबाग तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी सेझ आणि टाटा रिलायन्सच्या वीज प्रकल्पासाठी घेण्यात आल्या. काही जमिनी अजूनही ताब्यात घेतल्या जात आहेत. पण सरकार म्हणत असलेल्या नापीक जमिनीवर भाताचे बंपर पीक आले आहे.विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यातील याच सुपीक जमिनींचा उल्लेख सरकारी कागदपत्रांमध्ये चक्क नापीक असा आहे. कोणत्याही सुपीक जमिनीवर सेझ उभारला जाणार नाही, असे सरकार म्हणते. पण सरकारने देऊकेलेल्या या जमिनीवर तर भाताचे बंपर पीक डोलत आहे. त्यामुळे या जमिनी सुपीक की नापीक हे आता सरकारला नव्याने ठरवावे लागेल. आता हे शेतकरी आपली काळी आई वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत. पण त्यांना सहकार्याचा हात एकही राजकीय पक्ष देत नाही. याच दिवाळीत इथे भराव टाकला जाणार आहे. म्हणजेच यानंतर आता इथे डोलणारी कणसे दिसणार नाहीत.सरकारी यंत्रणेला ही सुपीक जमीन दिसत नाही. राजकीय पक्षांना शेतकर्‍यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, अशा परिस्थितीत या शेतकर्‍यांनीच आता एकजुटीने लढा देण्याची तयारी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 23, 2010 11:14 AM IST

सेझसाठी सुपीक जमिनी ठरवल्या नापीक

विनय म्हात्रे, रायगड

23 सप्टेंबर

रायगड जिल्ह्यातील पेण अलिबाग तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी सेझ आणि टाटा रिलायन्सच्या वीज प्रकल्पासाठी घेण्यात आल्या.

काही जमिनी अजूनही ताब्यात घेतल्या जात आहेत. पण सरकार म्हणत असलेल्या नापीक जमिनीवर भाताचे बंपर पीक आले आहे.

विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यातील याच सुपीक जमिनींचा उल्लेख सरकारी कागदपत्रांमध्ये चक्क नापीक असा आहे.

कोणत्याही सुपीक जमिनीवर सेझ उभारला जाणार नाही, असे सरकार म्हणते. पण सरकारने देऊकेलेल्या या जमिनीवर तर भाताचे बंपर पीक डोलत आहे.

त्यामुळे या जमिनी सुपीक की नापीक हे आता सरकारला नव्याने ठरवावे लागेल. आता हे शेतकरी आपली काळी आई वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत.

पण त्यांना सहकार्याचा हात एकही राजकीय पक्ष देत नाही. याच दिवाळीत इथे भराव टाकला जाणार आहे.

म्हणजेच यानंतर आता इथे डोलणारी कणसे दिसणार नाहीत.सरकारी यंत्रणेला ही सुपीक जमीन दिसत नाही.

राजकीय पक्षांना शेतकर्‍यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, अशा परिस्थितीत या शेतकर्‍यांनीच आता एकजुटीने लढा देण्याची तयारी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 23, 2010 11:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close