S M L

मुदत संपली, टोल सुरूच...

अद्वैत मेहता, पुणे23 सप्टेंबरपुण्याजवळील हडपसर - सासवड रस्त्यावरील टोलनाका मुदत संपून 3 वर्ष झाली तरी सुरूच आहे. पूल बांधल्याचा खर्च वसूल न झाल्याने कंत्राटदाराने टोलची मुदत वाढवून मागितली. पण अद्याप शासन निर्णय प्रलंबित असूनही टोलच्या नावाखाली वाहनचालकांची लूट सुरूच आहे.पुण्याहून बारामतीला जाताना हडपसरच्या पुढे सासवड मार्गावर फुरसुंगी टोलनाका 2002 साली सुरू करण्यात आला. 03-06-2002 पासून 30-07-2007 म्हणजे 5 वर्षांच्या कालावधीसाठी टोलवसूलीचे कंत्राट देण्यात आले. पूल बांधण्यासाठी आलेला 12 कोटी रूपये खर्च या 5 वर्षांत वसूल होणे अपेक्षित होते. पण 3 वर्ष उलटूनही टोलवसुली सुरूच आहे.तुषार झेंडे या जागरूक कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकाराचा वापर करत या टोलधाडीचा पर्दाफाश केला. पूल बांधणारे कन्स्ट्रक्शनवाले तसेच टोलवसूल करणारे ठेकेदार आणि एमएसआरडीसीचे अधिकारी यांचे साटलोटे असल्याचा गंभीर आरोप झेंडे यांनी केला आहे.दुसरीकडे या मार्गावर वाहतूक करणार्‍या वाहनचालकांना तसंच स्थानिक नागरिकांनाही रस्त्याच्या दुरवस्थेचा त्रास होत आहे.मुदत उलटून गेल्यानंतर शासन निर्णय प्रलंबित असतानाही टोलवसूलीच्या नावाखाली जी वसूली सुरू आहे, त्याला सरकार आळा घालणार का, हा खरा सवाल आहे.मालवाहतूक संघटनेचा इशारापुणे - बंगळुरू हायवेवरील पुणे ते कोल्हापूर दरम्यान चारही टोल नाक्यांवर टोल न भरण्याचा इशारा मालवाहतूक संघटनेने दिला आहे.2 ऑक्टोबरपासून टोल न भरण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर मालवाहतूक संघटनेची आज पालकमंत्री रामराजे निंबाळकर यांच्यासोबत झाली. या बैठकीत मुख्यमंत्री आणि नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याशी टोलच्या मुद्यावर चर्चा करण्याचे आश्वासन निंबाळकर यांनी दिले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 23, 2010 02:58 PM IST

मुदत संपली, टोल सुरूच...

अद्वैत मेहता, पुणे

23 सप्टेंबर

पुण्याजवळील हडपसर - सासवड रस्त्यावरील टोलनाका मुदत संपून 3 वर्ष झाली तरी सुरूच आहे. पूल बांधल्याचा खर्च वसूल न झाल्याने कंत्राटदाराने टोलची मुदत वाढवून मागितली. पण अद्याप शासन निर्णय प्रलंबित असूनही टोलच्या नावाखाली वाहनचालकांची लूट सुरूच आहे.

पुण्याहून बारामतीला जाताना हडपसरच्या पुढे सासवड मार्गावर फुरसुंगी टोलनाका 2002 साली सुरू करण्यात आला. 03-06-2002 पासून 30-07-2007 म्हणजे 5 वर्षांच्या कालावधीसाठी टोलवसूलीचे कंत्राट देण्यात आले. पूल बांधण्यासाठी आलेला 12 कोटी रूपये खर्च या 5 वर्षांत वसूल होणे अपेक्षित होते. पण 3 वर्ष उलटूनही टोलवसुली सुरूच आहे.

तुषार झेंडे या जागरूक कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकाराचा वापर करत या टोलधाडीचा पर्दाफाश केला. पूल बांधणारे कन्स्ट्रक्शनवाले तसेच टोलवसूल करणारे ठेकेदार आणि एमएसआरडीसीचे अधिकारी यांचे साटलोटे असल्याचा गंभीर आरोप झेंडे यांनी केला आहे.

दुसरीकडे या मार्गावर वाहतूक करणार्‍या वाहनचालकांना तसंच स्थानिक नागरिकांनाही रस्त्याच्या दुरवस्थेचा त्रास होत आहे.मुदत उलटून गेल्यानंतर शासन निर्णय प्रलंबित असतानाही टोलवसूलीच्या नावाखाली जी वसूली सुरू आहे, त्याला सरकार आळा घालणार का, हा खरा सवाल आहे.

मालवाहतूक संघटनेचा इशारा

पुणे - बंगळुरू हायवेवरील पुणे ते कोल्हापूर दरम्यान चारही टोल नाक्यांवर टोल न भरण्याचा इशारा मालवाहतूक संघटनेने दिला आहे.

2 ऑक्टोबरपासून टोल न भरण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर मालवाहतूक संघटनेची आज पालकमंत्री रामराजे निंबाळकर यांच्यासोबत झाली.

या बैठकीत मुख्यमंत्री आणि नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याशी टोलच्या मुद्यावर चर्चा करण्याचे आश्वासन निंबाळकर यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 23, 2010 02:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close