S M L

प्रवासी विमा योजनेची बेस्टतर्फे फक्त घोषणाच, अंमलबजावणी नाही

28 ऑक्टोबर, मुंबई कुर्ला इथं बेस्ट बसमध्ये झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्या प्रवाशाला बेस्टनं 5 हजार रुपयाची मदत जाहीर केली.मात्र ही रक्कम प्रवासी विमा योजनेतील नसल्याचं उघड झालं आहे. बरीच जाहिरात करुन बेस्टनं प्रवासी विमा योजना जाहीर केली होती, पण बेस्टनं विमा योजना राबवण्यासाठी पाऊलच उचलेलं नाही, असं 'आयबीएन लोकमत ' नं केलेल्या तपासात उघड झालं आहे.बैलबाजार परिसरात राहुल राज या तरुणानं बेस्ट बसमध्ये गोळीबार केला. त्यात मनोज भगत हे प्रवासी जखमी झाले. बेस्टनं त्यांना 5 हजार रुपये मदत जाहीर केली खरी, पण ती स्वत:च्या खिशातून. या विषयावर बोलताना बेस्टचे महाव्यवस्थापक उत्तम खोब्रागडे म्हणाले, ' आम्ही 5 हजार रुपये देणार आहोत. त्याला इन्शुअरन्स म्हणता येणार नाही. पण आम्ही 5 हजार रुपये मदत जाहीर केली आहे '. बेस्टनं प्रवाशांसाठी विमा योजना सुरू करत असल्याचं जाहीर केलं होतं. पण प्रत्यक्षात कोणत्याही विमा कंपनीकडे बेस्ट गेलेली नाही. अपघातग्रस्त प्रवाशाला फक्त नुकससानभरपाई देण्यात आली आहे. महापालिका सभागृहात या प्रस्ताव मंजूर होणं आवश्यक आहे. पण प्रत्यक्षात या प्रस्तावाचा पाठपुरावा न झाल्यानं विमा योजना प्रत्यक्षात आलेली नाही. दरदिवशी 40 लाख मुंबईकरांना ने-आण करणारी बेस्ट आतातरी प्रवासी विमा योजनेची अंमलबजावणी करेल, अशीच आशा बेस्टचे प्रवासी करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 28, 2008 07:21 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 28, 2008 07:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close