S M L

'स्वाभिमान'च्या वाहतूक सेना अध्यक्षावर हल्ला

23 सप्टेंबरस्वाभिमान संघटनेच्या वाहतूक सेनेचे अध्यक्ष चिंटू शेख यांच्यावर आज हल्ला झाला. नितेश राणेंनी आपल्यावर गोळीबार केल्याचा आरोप चिंटू शेख यांनी केला. स्वाभिमान संघटनेच्या खारमधील ऑफिसमध्ये ही घटना घडली. सध्या चिंटू शेखवर पवईतील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यासंदर्भात पोलीस सध्या चौकशी करत आहेत. यासंदर्भात खार पोलीस स्टेशनमध्ये 307 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये नितेश राणेंचेही नाव आहे. चिंटू शेखने केलेले आरोप खोटे असल्याचा दावा नितेश राणेंनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 23, 2010 05:35 PM IST

'स्वाभिमान'च्या वाहतूक सेना अध्यक्षावर हल्ला

23 सप्टेंबर

स्वाभिमान संघटनेच्या वाहतूक सेनेचे अध्यक्ष चिंटू शेख यांच्यावर आज हल्ला झाला. नितेश राणेंनी आपल्यावर गोळीबार केल्याचा आरोप चिंटू शेख यांनी केला.

स्वाभिमान संघटनेच्या खारमधील ऑफिसमध्ये ही घटना घडली. सध्या चिंटू शेखवर पवईतील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यासंदर्भात पोलीस सध्या चौकशी करत आहेत.

यासंदर्भात खार पोलीस स्टेशनमध्ये 307 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये नितेश राणेंचेही नाव आहे. चिंटू शेखने केलेले आरोप खोटे असल्याचा दावा नितेश राणेंनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 23, 2010 05:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close