S M L

मालगाडीच्या ठोकरीने 7 हत्तींचा मृत्यू

24 सप्टेंबरपश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे मालगाडीच्या ठोकरीने 7 हत्तींचा मृत्यू झाला आहे. याबद्दल केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, योग्य ती काळजी न घेतल्याबद्दल रेल्वे बोर्डाला पत्रही लिहिले आहे. प. बंगालमध्ये जलपाईगुडीजवळ बुधवारी रात्री ही दुर्घटना घडली होती. हत्तींचा हा कळप बनारहाट आणि पिन्नागुरी दरम्यान रेल्वे ट्रॅक पार करत होता. त्याचवेळी तिथून जाणार्‍या मालगाडीने या कळपाला उडवले. त्यात 5 हत्तींचा जागेवरच मृत्यू झाला. तर 2 हत्ती व्हेटर्नरी हॉस्पिटलमध्ये नेत असताना मृत्यू पावले. मृत हत्तींमध्ये 3 पिल्लांचाही समावेश आहे. तर एका जखमी हत्तीवर उपचार सुरू आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 24, 2010 12:03 PM IST

मालगाडीच्या ठोकरीने 7 हत्तींचा मृत्यू

24 सप्टेंबर

पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे मालगाडीच्या ठोकरीने 7 हत्तींचा मृत्यू झाला आहे.

याबद्दल केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, योग्य ती काळजी न घेतल्याबद्दल रेल्वे बोर्डाला पत्रही लिहिले आहे.

प. बंगालमध्ये जलपाईगुडीजवळ बुधवारी रात्री ही दुर्घटना घडली होती. हत्तींचा हा कळप बनारहाट आणि पिन्नागुरी दरम्यान रेल्वे ट्रॅक पार करत होता.

त्याचवेळी तिथून जाणार्‍या मालगाडीने या कळपाला उडवले. त्यात 5 हत्तींचा जागेवरच मृत्यू झाला.

तर 2 हत्ती व्हेटर्नरी हॉस्पिटलमध्ये नेत असताना मृत्यू पावले. मृत हत्तींमध्ये 3 पिल्लांचाही समावेश आहे.

तर एका जखमी हत्तीवर उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2010 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close