S M L

तरुणीची जलशुद्धी परीक्षा...

24 सप्टेंबररामायणात सीतामातेला जसे आपले पवित्रता सिद्ध करण्यासाठी अग्नी परीक्षा द्यावी लागली होती. त्याप्रमाणेच आज एकविसाव्या शतकातही स्त्रीला आपली पवित्रता सिद्ध करण्यासाठी परीक्षा द्यावी लागते आहे. हा प्रकार पाहायला मिळाला, अंबरनाथ शहरापासून दोन ते तीन किलोमीटरवरील बंजारा वस्तीत... एक मुलगी आपल्या वस्तीतून दोन दिवस बाहेर होती. मात्र जेव्हा ती परत आली तेव्हा तिला समाजात परतण्यासाठी एका परीक्षेला सामोरे जावे लागले. बंजारा समाजाच्या पंचायतीने वस्तीबाहेर जंगल परिसरात एक पाच फुटाचा खड्डा खणून त्यात पाणी भरले. आणि या पाण्यात त्या मुलीला उडी घेण्यास सांगितले. त्यानंतर तिला त्याच अवस्थेत बराच वेळ पाण्यात बुडून राहावे लागले. त्यानंतर तिचे शुद्धीकरण झाले, असा निर्वाळा पंचायतीने दिला. त्यानंतर या मुलीच्या कुटुंबाला तीन दिवसानंतर समाजात पुन्हा घेतले गेले. विशेष म्हणजे या कुटुंबाकडून पंचायतीने दंडही आकारला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 24, 2010 02:24 PM IST

तरुणीची जलशुद्धी परीक्षा...

24 सप्टेंबर

रामायणात सीतामातेला जसे आपले पवित्रता सिद्ध करण्यासाठी अग्नी परीक्षा द्यावी लागली होती. त्याप्रमाणेच आज एकविसाव्या शतकातही स्त्रीला आपली पवित्रता सिद्ध करण्यासाठी परीक्षा द्यावी लागते आहे. हा प्रकार पाहायला मिळाला, अंबरनाथ शहरापासून दोन ते तीन किलोमीटरवरील बंजारा वस्तीत...

एक मुलगी आपल्या वस्तीतून दोन दिवस बाहेर होती. मात्र जेव्हा ती परत आली तेव्हा तिला समाजात परतण्यासाठी एका परीक्षेला सामोरे जावे लागले. बंजारा समाजाच्या पंचायतीने वस्तीबाहेर जंगल परिसरात एक पाच फुटाचा खड्डा खणून त्यात पाणी भरले. आणि या पाण्यात त्या मुलीला उडी घेण्यास सांगितले. त्यानंतर तिला त्याच अवस्थेत बराच वेळ पाण्यात बुडून राहावे लागले.

त्यानंतर तिचे शुद्धीकरण झाले, असा निर्वाळा पंचायतीने दिला. त्यानंतर या मुलीच्या कुटुंबाला तीन दिवसानंतर समाजात पुन्हा घेतले गेले. विशेष म्हणजे या कुटुंबाकडून पंचायतीने दंडही आकारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2010 02:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close