S M L

गोळीबारावरून राणे विरुद्ध शिवसेना

24 सप्टेंबरस्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते चिंटू शेख यांच्यावर झालेल्या गोळीबारावरून आता नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात जुंपली आहे. नितेश राणे यांनी आपल्यावर गोळीबार केल्याचा आरोप चिंटू शेख यांनी केला होता.पण त्यांना झालेली जखम ही बंदुकीच्या गोळीने झाली नसल्याचे मेडीकल रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे. प्राथमिक रिपोर्टमधून ही माहिती मिळाली असली तरी अजून अंतिम रिपोर्ट यायचा आहे. शेखवर हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पण ही जखम गोळीमुळे झाली नसल्याचे हिरानंदानी हॉस्पिटलने म्हटले आहे. पण आता या प्रकरणावरून नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात भांडण जुंपले आहे.दरम्यान या सर्व प्रकारामागे उद्धव ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप नारायण राणे केला आहे. तर शिवसेना षडयंत्र रचत नाही तर थेट भूमिका मांडते, या शब्दात नीलम गोर्‍हे यांनी नारायण राणेंना उत्तर दिले आहे. आज त्यांनी चिंटू शेख यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 24, 2010 05:24 PM IST

गोळीबारावरून राणे विरुद्ध शिवसेना

24 सप्टेंबर

स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते चिंटू शेख यांच्यावर झालेल्या गोळीबारावरून आता नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात जुंपली आहे. नितेश राणे यांनी आपल्यावर गोळीबार केल्याचा आरोप चिंटू शेख यांनी केला होता.

पण त्यांना झालेली जखम ही बंदुकीच्या गोळीने झाली नसल्याचे मेडीकल रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे. प्राथमिक रिपोर्टमधून ही माहिती मिळाली असली तरी अजून अंतिम रिपोर्ट यायचा आहे.

शेखवर हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पण ही जखम गोळीमुळे झाली नसल्याचे हिरानंदानी हॉस्पिटलने म्हटले आहे. पण आता या प्रकरणावरून नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात भांडण जुंपले आहे.

दरम्यान या सर्व प्रकारामागे उद्धव ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप नारायण राणे केला आहे.

तर शिवसेना षडयंत्र रचत नाही तर थेट भूमिका मांडते, या शब्दात नीलम गोर्‍हे यांनी नारायण राणेंना उत्तर दिले आहे. आज त्यांनी चिंटू शेख यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2010 05:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close