S M L

'गोसावींचा राज्याभिषेकच अधिकृत'

रोहिणी गोसावी, रायगड 25 सप्टेंबरछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वादात आता एका नवीन गोष्टीची भर पडली आहे. गागाभट्टांनी केलेल्या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापेक्षा 24 सप्टेंबर 1674 ला निश्चलपुरी गोसावी यांनी केलेला राज्याभिषेक अधिकृत आहे, असे दशनाम गोसावी समाजाचे म्हणणे आहे.त्यामुळे त्यांनी बहुजन समाजाच्या युवकांबरोबर काल रायगडावर हा राज्याभिषेक साजरा केला. गागाभटांनंतर निश्चलपुरी गोसावी यांनी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक केला, असे सांगण्यात येत आहे. हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अधिकृत व्हावा, यासाठी महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या आणि खासकरून दशनाम गोसावी समाजाच्या युवकांनी हा राज्याभिषेक रायगडावर साजरा केला.गागाभटांनी केलेल्या राज्याभिषेकात काही तांत्रिक चुका होत्या. म्हणजेच काही विधी राहून गेले होते. म्हणून त्यांनी निश्चलपुरी गोसावींकडून पुन्हा राज्याभिषेक करवून घेतला, असा उल्लेख इतिहासात आहे. पण शिवाजी महाराज हे विज्ञानाला मानणारे राजे होते. त्यामुळे ते अशा प्रकारचा तांत्रिक राज्याभिषेक करवून घेतील, यावर या तरुणांचा विश्वास नाही. तर शिक्षणाच्या जोरावर आपल्याला हवा तसा इतिहास काही लोकांनी लिहीला, असे या बहुजन समाजाचे म्हणणे आहे. तिथीनुसार आणि तारखेनुसार आजचा होणार्‍या राज्यभिषेकामध्ये अनेक राजकीय नेते आपली पोळी भाजून घेत असतात. पण आता स्वार्थ बाजूला ठेवून राजकीय नेत्यांनी आणि सरकारनेही यावर योग्य भूमिका घेणे गरजेचे आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 25, 2010 11:51 AM IST

'गोसावींचा राज्याभिषेकच अधिकृत'

रोहिणी गोसावी, रायगड

25 सप्टेंबर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वादात आता एका नवीन गोष्टीची भर पडली आहे. गागाभट्टांनी केलेल्या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापेक्षा 24 सप्टेंबर 1674 ला निश्चलपुरी गोसावी यांनी केलेला राज्याभिषेक अधिकृत आहे, असे दशनाम गोसावी समाजाचे म्हणणे आहे.त्यामुळे त्यांनी बहुजन समाजाच्या युवकांबरोबर काल रायगडावर हा राज्याभिषेक साजरा केला.

गागाभटांनंतर निश्चलपुरी गोसावी यांनी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक केला, असे सांगण्यात येत आहे. हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अधिकृत व्हावा, यासाठी महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या आणि खासकरून दशनाम गोसावी समाजाच्या युवकांनी हा राज्याभिषेक रायगडावर साजरा केला.

गागाभटांनी केलेल्या राज्याभिषेकात काही तांत्रिक चुका होत्या. म्हणजेच काही विधी राहून गेले होते. म्हणून त्यांनी निश्चलपुरी गोसावींकडून पुन्हा राज्याभिषेक करवून घेतला, असा उल्लेख इतिहासात आहे.

पण शिवाजी महाराज हे विज्ञानाला मानणारे राजे होते. त्यामुळे ते अशा प्रकारचा तांत्रिक राज्याभिषेक करवून घेतील, यावर या तरुणांचा विश्वास नाही. तर शिक्षणाच्या जोरावर आपल्याला हवा तसा इतिहास काही लोकांनी लिहीला, असे या बहुजन समाजाचे म्हणणे आहे.

तिथीनुसार आणि तारखेनुसार आजचा होणार्‍या राज्यभिषेकामध्ये अनेक राजकीय नेते आपली पोळी भाजून घेत असतात. पण आता स्वार्थ बाजूला ठेवून राजकीय नेत्यांनी आणि सरकारनेही यावर योग्य भूमिका घेणे गरजेचे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 25, 2010 11:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close