S M L

स्टेम सेल्स थेरपीसाठी प्रयत्न

अलका धुपकर, मुंबई25 सप्टेंबरमूळ पेशींचा वापर करत म्हणजेच स्टेम सेल्स थेरपीने असाध्य आजारांवर उपचार करण्याची सोय बीएमसीच्या फक्त सायन हॉस्पिटलमध्येच उपलब्ध आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये अडीच ते तीन लाख रुपयांत होणारी स्टेम सेल्स थेरपी सायन हॉस्पिटलमध्ये स्वस्त दरात करुन दिली जाते. मुंबईमध्ये स्टेम सेल्स थेरपीविषयी सरकारी आणि खाजगी हॉस्पिटल्समध्ये सुरु असलेल्या या सगळ्या प्रयत्नांना एकत्र आणण्याचे प्रयत्न आता सुरु झाले आहेत.सायन हॉस्पिटलमध्ये स्टेम सेल्सचा विभाग सुरू करण्याचे आणि ते यशस्वी करण्याचे श्रेय जाते ते डॉ. अलोक शर्मा यांना.मज्जांसंस्थेचे असाध्य आजार असलेल्या अनेक पेशंट्सना स्टेम सेल्स थेरपी ही नवी आशा वाटते आहे, ती यामुळेच.हाडांमधून म्हणजेच बोन मॅरोतील स्टेम सेल्स या थेरपीसाठी वापरल्या जातात. हे ऑपरेशन सुमारे सहा तास चालते. डॉ. शर्मा यांच्या ऑपरेशन थिएटरमध्ये येण्यासाठी अनेकजण वेटिंग लिस्टवर आहेत.मेडिकल ट्रीटमेंटमध्ये किंवा रिसर्चमध्ये स्टेम सेल्सचा वापर एवढा वाढला आहे. पण त्यासंबंधीचा कायदा संसदेत प्रलंबित आहे. दुसरीकडे स्टेम सेल्सच्या वापराविषयी आयसीएमआरने काढलेल्या गाईडलाईन्सना अंतिम स्वरुप देण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठीच महत्वाची ठरणार आहे ती मुंबईत 23 आणि 24 ऑक्टोबरला होणारी स्टेम सेल्सची राष्ट्रीय परिषद. एशिया नॉलेज असोसिएट्नी ही राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे.भारतातील ही स्टेम सेल्सची पहिलीच परिषद स्टेम सेल्स विषयीचे भारताचे धोरण ठरवण्याचे पहिले पाऊल असेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 25, 2010 01:19 PM IST

स्टेम सेल्स थेरपीसाठी प्रयत्न

अलका धुपकर, मुंबई

25 सप्टेंबर

मूळ पेशींचा वापर करत म्हणजेच स्टेम सेल्स थेरपीने असाध्य आजारांवर उपचार करण्याची सोय बीएमसीच्या फक्त सायन हॉस्पिटलमध्येच उपलब्ध आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये अडीच ते तीन लाख रुपयांत होणारी स्टेम सेल्स थेरपी सायन हॉस्पिटलमध्ये स्वस्त दरात करुन दिली जाते.

मुंबईमध्ये स्टेम सेल्स थेरपीविषयी सरकारी आणि खाजगी हॉस्पिटल्समध्ये सुरु असलेल्या या सगळ्या प्रयत्नांना एकत्र आणण्याचे प्रयत्न आता सुरु झाले आहेत.

सायन हॉस्पिटलमध्ये स्टेम सेल्सचा विभाग सुरू करण्याचे आणि ते यशस्वी करण्याचे श्रेय जाते ते डॉ. अलोक शर्मा यांना.मज्जांसंस्थेचे असाध्य आजार असलेल्या अनेक पेशंट्सना स्टेम सेल्स थेरपी ही नवी आशा वाटते आहे, ती यामुळेच.हाडांमधून म्हणजेच बोन मॅरोतील स्टेम सेल्स या थेरपीसाठी वापरल्या जातात. हे ऑपरेशन सुमारे सहा तास चालते. डॉ. शर्मा यांच्या ऑपरेशन थिएटरमध्ये येण्यासाठी अनेकजण वेटिंग लिस्टवर आहेत.

मेडिकल ट्रीटमेंटमध्ये किंवा रिसर्चमध्ये स्टेम सेल्सचा वापर एवढा वाढला आहे. पण त्यासंबंधीचा कायदा संसदेत प्रलंबित आहे. दुसरीकडे स्टेम सेल्सच्या वापराविषयी आयसीएमआरने काढलेल्या गाईडलाईन्सना अंतिम स्वरुप देण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठीच महत्वाची ठरणार आहे ती मुंबईत 23 आणि 24 ऑक्टोबरला होणारी स्टेम सेल्सची राष्ट्रीय परिषद. एशिया नॉलेज असोसिएट्नी ही राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे.

भारतातील ही स्टेम सेल्सची पहिलीच परिषद स्टेम सेल्स विषयीचे भारताचे धोरण ठरवण्याचे पहिले पाऊल असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 25, 2010 01:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close