S M L

कल्याण-डोंबिवलीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी

25 सप्टेंबर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येही आता आघाडी झाली आहे. काँग्रेसला 55, तर राष्ट्रवादीला 52 जागा देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. नारायण राणे यांच्या ज्ञानेश्वरी या निवासस्थानी ही बैठक झाली. त्या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, वसंत डावखरे, गणेश नाईक या प्रमुख नेत्यांसह स्थानिक नेते हजर होते. पण रिपब्लिकन पक्षाला या आघाडीत थेटपणे स्थान दिले गेले नाही. आता शिवसेना-भाजप युती विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी यांच्यात थेट सामना होणार हे स्पष्ट झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 25, 2010 02:09 PM IST

कल्याण-डोंबिवलीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी

25 सप्टेंबर

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येही आता आघाडी झाली आहे.

काँग्रेसला 55, तर राष्ट्रवादीला 52 जागा देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला.

नारायण राणे यांच्या ज्ञानेश्वरी या निवासस्थानी ही बैठक झाली. त्या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, वसंत डावखरे, गणेश नाईक या प्रमुख नेत्यांसह स्थानिक नेते हजर होते.

पण रिपब्लिकन पक्षाला या आघाडीत थेटपणे स्थान दिले गेले नाही. आता शिवसेना-भाजप युती विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी यांच्यात थेट सामना होणार हे स्पष्ट झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 25, 2010 02:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close