S M L

गोंदियात भुसामिश्रीत साखरेचा पुरवठा

26 सप्टेंबरगोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्जुनी तालुक्यात ऐन सणासुदीच्या काळात कोंडा आणि भुसा- मिशि्रत साखरेचा पुरवठा करण्यात येत आहे. जय महेश शुगर लिमिटेड या बीडच्या साखर कारखान्यातून गोंदीया जिल्हयात 1 हजार 62 क्विन्टल साखर मागवण्यात आली होती. पण त्यातील साखरेत मोठ्या प्रमाणात भुसा असल्याचे उघड झाले. सडक अर्जुनी तालुक्यात स्वस्त धान्याची 112 दुकाने आहेत. या तालुक्यातल्या धान्य दुकानांकरिता 24 ऑगस्टला 500 क्विंटल साखर मागवण्यात आली होती. पण या साखरेमध्ये उसाच्या चिपाडांचा भुसा आणि कोंडा असल्याचे नागरिकांना आढळले. त्यामुळे ही साखर विकत घेण्यास ग्राहकांनी नकार दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 26, 2010 01:15 PM IST

गोंदियात भुसामिश्रीत साखरेचा पुरवठा

26 सप्टेंबर

गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्जुनी तालुक्यात ऐन सणासुदीच्या काळात कोंडा आणि भुसा- मिशि्रत साखरेचा पुरवठा करण्यात येत आहे.

जय महेश शुगर लिमिटेड या बीडच्या साखर कारखान्यातून गोंदीया जिल्हयात 1 हजार 62 क्विन्टल साखर मागवण्यात आली होती.

पण त्यातील साखरेत मोठ्या प्रमाणात भुसा असल्याचे उघड झाले. सडक अर्जुनी तालुक्यात स्वस्त धान्याची 112 दुकाने आहेत.

या तालुक्यातल्या धान्य दुकानांकरिता 24 ऑगस्टला 500 क्विंटल साखर मागवण्यात आली होती.

पण या साखरेमध्ये उसाच्या चिपाडांचा भुसा आणि कोंडा असल्याचे नागरिकांना आढळले.

त्यामुळे ही साखर विकत घेण्यास ग्राहकांनी नकार दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2010 01:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close