S M L

चैत्यभुमीला इंदु मिलची चार एकर जागा

26 सप्टेंबरमुंबईतल्या दादर इथल्या चैत्यभुमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एैतिहासिक स्मारक उभारण्यासाठी सरकारने इंदु मिलची फक्त चार एकर जागा देण्याच ठरवले आहे. ऑक्टोबर महिन्यातल्या पहिल्याच आठवड्यात सरकार याची प्रक्रिया पुर्ण करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेत नाराजी पसरली आहे. इंदू मिलची 12 एक्कर आंबेडकरांच्या स्मारकासाठी मिळावी अशी मागणी गेल्या कित्येक दिवसापासून होत आहे. पण सरकारने चार एक्कर जागा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे आंबेडकरी नेते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. महापालिकाच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यामुळे सरकार घाई-घाईत ही प्रक्रिया पुर्ण करून आंबेडकरी जनते बद्दल आपल्याला कळवळा असल्याचा भास करून देत असल्याची टीकाही काही दलित नेत्यांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 26, 2010 01:54 PM IST

चैत्यभुमीला इंदु मिलची चार एकर जागा

26 सप्टेंबर

मुंबईतल्या दादर इथल्या चैत्यभुमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एैतिहासिक स्मारक उभारण्यासाठी सरकारने इंदु मिलची फक्त चार एकर जागा देण्याच ठरवले आहे.

ऑक्टोबर महिन्यातल्या पहिल्याच आठवड्यात सरकार याची प्रक्रिया पुर्ण करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेत नाराजी पसरली आहे.

इंदू मिलची 12 एक्कर आंबेडकरांच्या स्मारकासाठी मिळावी अशी मागणी गेल्या कित्येक दिवसापासून होत आहे. पण सरकारने चार एक्कर जागा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे आंबेडकरी नेते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

महापालिकाच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यामुळे सरकार घाई-घाईत ही प्रक्रिया पुर्ण करून आंबेडकरी जनते बद्दल आपल्याला कळवळा असल्याचा भास करून देत असल्याची टीकाही काही दलित नेत्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2010 01:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close