S M L

गेम्स व्हिलेज नव्हे फॉरेस्ट व्हिलेज

26 सप्टेंबरकॉमनवेल्थसाठी उभारण्यात आलेल्या गेम्स व्हिलेजचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. स्पर्धेच्या आयोजनातला सावळा गोंधळ अजूनही सुरुच आहे. दररोज एकेक विचित्र प्रकार घडत आहे. गेम्स व्हिलेजमध्ये एका खेळाडूच्या खोलीत चक्क साप दिसल्याचा दावा दक्षिण आफ्रिकेच्या उच्चायुक्तांनी केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना राहण्यासाठी देण्यात आलेल्या रुममध्ये साप आढळून आला आहे. जोपर्यंत पूर्ण सुधारणा होत नाहीत तोपर्यंत आमचे खेळाडू या रुम्समध्ये राहणार नाहीत, खेळाडूंच्या जीवाला धोका आहे असे हॅरिस मेजेक यांनी म्हटले आहे. तसेच गेम्स व्हिलेजचा परिसरातही घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी पाण्याची तळी साचलीत, आणि याची तक्रार आयोजन समितीकडे केल्याचे मेजेक यांनी म्हटले आहे.नवीन डेडलाईन केंद्र सरकारनेही कॉमनवेल्थ गेम्सच्या स्वच्छतेसाठी आता नवीन डेडलाईन दिली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दिक्षीत यांनी आज सकाळी एक तातडीची बैठक घेतली. व्हिलेजचे स्वच्छतेचे काम बुधवारपर्यंत पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले. अजून 400 रुम्स ऍथलीट्ससाठी तयार करण्यात येत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. पण सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 1168 रुम्सपैकी फक्त 409 रुम्सचे पूर्णत: तयार आहेत. सकाळी घेण्यात आलेल्या बैठकीत आयोजन समितीचे अधिकारी, दिल्ली विकासप्राधिकरणाचे अधिकारी आणि महानगरपालिकेचे काही पदाधिकारी हजर होते. आणखी तीन खेळाडूंची माघार कॉमनवेल्थ स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय खेळाडु माघार घेतायत आहे. त्यात आज आणखी काही ऍथलिट्सची भर पडली आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या तीन प्रमुख खेळाडूंनी आज कॉमनवेल्थमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडची नंबर वन टेनिस प्लेअर एलेना बाल्टचा हिने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. कॉमनवेल्थचे ढिसाळ आयोजन आणि अस्वच्छतेच्या बातम्या आपण वाचल्या आणि स्पर्धेत खेळण्याचा विचार रद्द केला असे मत एलेनाने व्यक्त केले आहे. डेली टेलीग्राफ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखातीत तीने आपले मत व्यक्त केले. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंनीही आज माघार घेतली. सायकलपटू ट्रॅवीस मेयर आणि टेबल टेनिसपटू स्टिफन सँग यांचा यात समावेश आहे. भारतातली सुरक्षा आणि आरोग्याच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे त्याने म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाची थाळीफेकपटू दानी सॅम्युएलने याच कारणास्तव माघार घेतली होती. कॉमनवेल्थच्या सीईओंनी ढिसाळपणासाठी धरले भारत सरकारलाच जबाबदारदरम्यान, कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनचे सीईओ माईक हुपर यांनी कॉमनवेल्थमधल्या रेंगाळलेल्या कामांबद्दल भारत सरकार आणि संबंधित संस्थांना दोष दिला आहे. एका ऑस्ट्रेलियन टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दलची नाराजी व्यक्त केली. आपण केवळ वस्तुस्थिती सांगत आहोत, भारत सरकारला दोष देत नाही आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीतल्या ट्रॅफिक जॅमचे खापर आपण भारताच्या लोकसंख्येवर फोडले नसल्याचंही हुपर यांनी म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 26, 2010 05:18 PM IST

गेम्स व्हिलेज नव्हे फॉरेस्ट व्हिलेज

26 सप्टेंबर

कॉमनवेल्थसाठी उभारण्यात आलेल्या गेम्स व्हिलेजचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. स्पर्धेच्या आयोजनातला सावळा गोंधळ अजूनही सुरुच आहे.

दररोज एकेक विचित्र प्रकार घडत आहे. गेम्स व्हिलेजमध्ये एका खेळाडूच्या खोलीत चक्क साप दिसल्याचा दावा दक्षिण आफ्रिकेच्या उच्चायुक्तांनी केला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना राहण्यासाठी देण्यात आलेल्या रुममध्ये साप आढळून आला आहे. जोपर्यंत पूर्ण सुधारणा होत नाहीत तोपर्यंत आमचे खेळाडू या रुम्समध्ये राहणार नाहीत, खेळाडूंच्या जीवाला धोका आहे असे हॅरिस मेजेक यांनी म्हटले आहे.

तसेच गेम्स व्हिलेजचा परिसरातही घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी पाण्याची तळी साचलीत, आणि याची तक्रार आयोजन समितीकडे केल्याचे मेजेक यांनी म्हटले आहे.

नवीन डेडलाईन

केंद्र सरकारनेही कॉमनवेल्थ गेम्सच्या स्वच्छतेसाठी आता नवीन डेडलाईन दिली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दिक्षीत यांनी आज सकाळी एक तातडीची बैठक घेतली.

व्हिलेजचे स्वच्छतेचे काम बुधवारपर्यंत पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले. अजून 400 रुम्स ऍथलीट्ससाठी तयार करण्यात येत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले.

पण सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 1168 रुम्सपैकी फक्त 409 रुम्सचे पूर्णत: तयार आहेत. सकाळी घेण्यात आलेल्या बैठकीत आयोजन समितीचे अधिकारी, दिल्ली विकासप्राधिकरणाचे अधिकारी आणि महानगरपालिकेचे काही पदाधिकारी हजर होते.

आणखी तीन खेळाडूंची माघार

कॉमनवेल्थ स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय खेळाडु माघार घेतायत आहे. त्यात आज आणखी काही ऍथलिट्सची भर पडली आहे.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या तीन प्रमुख खेळाडूंनी आज कॉमनवेल्थमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

इंग्लंडची नंबर वन टेनिस प्लेअर एलेना बाल्टचा हिने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. कॉमनवेल्थचे ढिसाळ आयोजन आणि अस्वच्छतेच्या बातम्या आपण वाचल्या आणि स्पर्धेत खेळण्याचा विचार रद्द केला असे मत एलेनाने व्यक्त केले आहे.

डेली टेलीग्राफ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखातीत तीने आपले मत व्यक्त केले. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंनीही आज माघार घेतली.

सायकलपटू ट्रॅवीस मेयर आणि टेबल टेनिसपटू स्टिफन सँग यांचा यात समावेश आहे. भारतातली सुरक्षा आणि आरोग्याच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे त्याने म्हटले आहे.

दोन दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाची थाळीफेकपटू दानी सॅम्युएलने याच कारणास्तव माघार घेतली होती.

कॉमनवेल्थच्या सीईओंनी ढिसाळपणासाठी धरले भारत सरकारलाच जबाबदार

दरम्यान, कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनचे सीईओ माईक हुपर यांनी कॉमनवेल्थमधल्या रेंगाळलेल्या कामांबद्दल भारत सरकार आणि संबंधित संस्थांना दोष दिला आहे.

एका ऑस्ट्रेलियन टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दलची नाराजी व्यक्त केली. आपण केवळ वस्तुस्थिती सांगत आहोत, भारत सरकारला दोष देत नाही आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

दिल्लीतल्या ट्रॅफिक जॅमचे खापर आपण भारताच्या लोकसंख्येवर फोडले नसल्याचंही हुपर यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2010 05:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close