S M L

मिहान प्रकल्पावरून हायकोर्टाकडून सरकारला नोटीसा

27 सप्टेंबर मिहान प्रकल्पातील काही मुद्यांवरून मुंबई हायकोर्टाने राज्य आणि केंद्र सरकारला नोटीसा बजावल्या आहेत. नागपूरच्या मिहान प्रकल्पासाठी जमिनी विकताना मिहानच्या अधिकार्‍यांनी काही कंपन्यांवर जरा जास्तच मर्जी दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे. कमी भावात शेकडो एकर जमीन देण्यात आली आहे. इतकेच नाही तर सत्यम कंपनीला 100 एकरचा तेल्हारा तलावही भेट देण्यात आला आहे. आणि याच विषयी एक याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती. कोर्टाने ही बाब गंभीरतेने घेत अखेर राज्य आणि केंद्र सरकारबरोबरच मिहानलाही नोटीस बजावली आहे. पुन्हा दोन आठवड्याने ही याचिका कोर्टासमोर सुनावणीसाठी येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 27, 2010 12:20 PM IST

मिहान प्रकल्पावरून हायकोर्टाकडून सरकारला नोटीसा

27 सप्टेंबर

मिहान प्रकल्पातील काही मुद्यांवरून मुंबई हायकोर्टाने राज्य आणि केंद्र सरकारला नोटीसा बजावल्या आहेत.

नागपूरच्या मिहान प्रकल्पासाठी जमिनी विकताना मिहानच्या अधिकार्‍यांनी काही कंपन्यांवर जरा जास्तच मर्जी दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे. कमी भावात शेकडो एकर जमीन देण्यात आली आहे.

इतकेच नाही तर सत्यम कंपनीला 100 एकरचा तेल्हारा तलावही भेट देण्यात आला आहे.

आणि याच विषयी एक याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती.

कोर्टाने ही बाब गंभीरतेने घेत अखेर राज्य आणि केंद्र सरकारबरोबरच मिहानलाही नोटीस बजावली आहे.

पुन्हा दोन आठवड्याने ही याचिका कोर्टासमोर सुनावणीसाठी येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2010 12:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close