S M L

भारतीय खेळाडूंचा सराव सुरू

दिग्विजय सिंग देवो, नवी दिल्ली27 सप्टेंबर कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू दिल्लीत दाखल होत आहेत. तर भारतीय खेळाडू याआधीच गेम्स व्हिलेजमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी सरावही सुरू केला आहे. स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचे ध्येय ते बाळगून आहेत. भारतीय खेळाडुंसाठी कॉमनवेल्थ गेम्स ही एक चांगली संधी आहे. गेल्या काही वर्षांत अशाच मोठ्या स्पर्धांमधून चांगली कामगिरी करणारे देशातील अनेक खेळाडू हिरो ठरले आहेत. यात 9 वेळा बिलीयर्डसमध्ये वर्ल्ड चॅम्पियन ठरलेला गीत सेठी एशियन गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे कॉमनवेल्थ मध्ये सहभागी होणार्‍या इतर सहकारी खेळाडूंना त्याने खास टिप्स दिल्या आहेत. अशा मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होताना येणार्‍या दडपणाची लिएंडर पेसला सवयच झाली आहे. त्याने आतापर्यंत अशा प्रकारच्या प्रत्येक स्पर्धेत मेडल मिळवले आहे. त्यामुळे यंदाही तो त्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय खेळाडूंसाठी हा आठवडा निर्णायक आहे. यापुढील आठवड्यात कॉमनवेल्थ गेम्सना सुरुवात होईल. त्यावेळी मात्र त्यांचे लक्ष्य असेल ते सर्वोत्तम कामगिरी करण्यावर...

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 27, 2010 01:20 PM IST

भारतीय खेळाडूंचा सराव सुरू

दिग्विजय सिंग देवो, नवी दिल्ली

27 सप्टेंबर

कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू दिल्लीत दाखल होत आहेत. तर भारतीय खेळाडू याआधीच गेम्स व्हिलेजमध्ये दाखल झाले आहेत.

त्यांनी सरावही सुरू केला आहे. स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचे ध्येय ते बाळगून आहेत.

भारतीय खेळाडुंसाठी कॉमनवेल्थ गेम्स ही एक चांगली संधी आहे.

गेल्या काही वर्षांत अशाच मोठ्या स्पर्धांमधून चांगली कामगिरी करणारे देशातील अनेक खेळाडू हिरो ठरले आहेत.

यात 9 वेळा बिलीयर्डसमध्ये वर्ल्ड चॅम्पियन ठरलेला गीत सेठी एशियन गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

त्यामुळे कॉमनवेल्थ मध्ये सहभागी होणार्‍या इतर सहकारी खेळाडूंना त्याने खास टिप्स दिल्या आहेत.

अशा मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होताना येणार्‍या दडपणाची लिएंडर पेसला सवयच झाली आहे.

त्याने आतापर्यंत अशा प्रकारच्या प्रत्येक स्पर्धेत मेडल मिळवले आहे.

त्यामुळे यंदाही तो त्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय खेळाडूंसाठी हा आठवडा निर्णायक आहे.

यापुढील आठवड्यात कॉमनवेल्थ गेम्सना सुरुवात होईल.

त्यावेळी मात्र त्यांचे लक्ष्य असेल ते सर्वोत्तम कामगिरी करण्यावर...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2010 01:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close