S M L

दिल्लीकरांसमोर ट्रॅफिकचे संकट

27 सप्टेंबर कॉमनवेल्थ स्पर्धेला आता सहा दिवस उरले आहेत. या स्पर्धेमुळे दिल्लीसमोर एक नवे संकट उभे राहिले आहे, ते ट्राफिक जॅमचे. आजपासून शहरातील बहुतेक रस्त्यांवर एक खास लेन कॉमनवेल्थ ऍथलीट आणि अधिकार्‍यांसाठी राखून ठेवण्यात आली आहे. ही लेन अर्थातच इतर गाड्यांसाठी बंद असेल. येत्या 16 ऑक्टोबरपर्यंत सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत ही लेन फक्त कॉमनवेल्थसाठीच वापरली जाईल. त्यामुळे शहरातील ट्राफिकवर त्याचा परिणाम जाणवत आहे. दिल्ली पोलिसांनी गेम्स व्हिलेज आणि इतर स्टेडिअमच्या आसपासच्या रस्त्यांवर सुरक्षा व्यवस्थाही वाढवली आहे. आणि दिल्लीकरांनी पुढचे पंधरा दिवस हे रस्ते टाळावेत अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 27, 2010 02:08 PM IST

दिल्लीकरांसमोर ट्रॅफिकचे संकट

27 सप्टेंबर

कॉमनवेल्थ स्पर्धेला आता सहा दिवस उरले आहेत. या स्पर्धेमुळे दिल्लीसमोर एक नवे संकट उभे राहिले आहे, ते ट्राफिक जॅमचे.

आजपासून शहरातील बहुतेक रस्त्यांवर एक खास लेन कॉमनवेल्थ ऍथलीट आणि अधिकार्‍यांसाठी राखून ठेवण्यात आली आहे.

ही लेन अर्थातच इतर गाड्यांसाठी बंद असेल. येत्या 16 ऑक्टोबरपर्यंत सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत ही लेन फक्त कॉमनवेल्थसाठीच वापरली जाईल.

त्यामुळे शहरातील ट्राफिकवर त्याचा परिणाम जाणवत आहे. दिल्ली पोलिसांनी गेम्स व्हिलेज आणि इतर स्टेडिअमच्या आसपासच्या रस्त्यांवर सुरक्षा व्यवस्थाही वाढवली आहे.

आणि दिल्लीकरांनी पुढचे पंधरा दिवस हे रस्ते टाळावेत अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2010 02:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close