S M L

बेस्ट सेलर दिवाळी अंक

28 ऑक्टोबर, पुणे - महाराष्ट्रात दिवाळी आणि दिवाळी अंकांचं अतूट नातं आहे. एकेकाळी दिवाळी अंक म्हटलं की 'आवाज' आणि त्यातली खिडकी चित्रं आठवतात. 90 हजारांपर्यंत खप गेलेला आणि ऑडिट ब्युरो सर्क्युलेशनचं सर्टिफिकेट मिळवलेला मराठीतला हा पहिलाच अंक. पण आता लोकांच्या आवडीनिवडी बदलत चालल्या आहेत. त्यामुळे 'शतायुषी', 'ग्रहांकित', 'माहेर', 'किशोर', 'छात्रप्रबोधन' यांचं व्यावसायिक यशही वाढत चाललं आहे. 'शतायुषी' हा सध्या मराठीतील सर्वाधिक खपाचा अंक आहे. 'शतायुषी' 1979 मध्ये सुरू झाला. त्यावेळी त्याचा खप होता 5 हजार. पण गेल्या काही वर्षांपासून तो आकडा 50 हजारांच्याही पुढे पोहोचला आहे. जगभरातील प्रसिद्ध डॉक्टर 'शतायुषी'त लिहितात. 'शतायुषी'चे अरविंद संगमनेरकर संपादक आहेत. 'शतायुषी'नंतर नंबर लागतो तो 'आवाज' आणि 'ग्रहांकित'चा. 1977पासून चंद्रकांत शेवाळे 'ग्रहांकित' काढत आहेत. या अंकांच्या तर पुस्तकाप्रमाणे आवृत्याही निघाल्या आहेत. याबाबत ग्रहांकितचे संपादक चंद्रकांत शेवाळे म्हणाले, 'ग्रहांकितच्या 1995 च्या दिवाळी अंकाच्या सात आवृत्या झाल्या आहेत. 1996 च्या तीन आवृत्या, 1997 च्या सहा आवृत्या, 1998, 1999, 2000 च्या दोनपेक्षा जास्त आवृत्या झाल्या आहेत. तर 2004 आणि 2007 च्या आवृत्या प्रसिद्धीच्या मार्गावर आहेत'. पुस्तकाप्रमाणे आवृत्या निघण्याचं भाग्य ग्रहांकितला मिळालं. 'छात्रप्रबोधन' या विद्यार्थ्यांविषयीच्या दिवाळी अंकानंही अलिकडच्या काळात मोठी मजल मारली आहे. यंदा त्यांनी एक वेगळाच प्रयोग केला आहे. 'छात्रप्रबोधन'चे संपादक महेंद्र सेठिया सांगतात, 'ग्रामीण भागासाठी पूर्णपणे वेगळा अंक काढलेला आहे. जिथं चार हजारापेक्षा कमी वस्ती असलेली गावं आहेत. अशा गावांच्या मुलांसाठी आम्ही अंक काढला आहे. या अंकाच्या 6500 प्रती छापल्या आहेत आणि तो केवळ आपण 15 रूपयांत दिला जाईल'. 'छात्रप्रबोधन' दिवाळी अंक मार्केटिंगशिवाय विकले गेले आहेत. 'हे सर्व बुकिंग प्रकाशनपूर्व होतं. एकही अंक आपण कमिशनवर देत नाही. महाराष्ट्र-गोवा मिळून जवळपास 120 गावांतील 400 ते 450 कार्यकर्त्यांनी ही नोंदणी केलेली आहे', अशी माहिती महेंद्र सेठिया यांनी दिली. 'माहेर' हा अंकही महिलांमध्ये खूपच पॉप्युलर आहे. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांना दिवाळी अंकांची क्रेझ असल्याचं दिसून येतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 28, 2008 10:04 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 28, 2008 10:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close