S M L

अयोध्या याचिकेवर उद्या सुनावणी

27 सप्टेंबरअयोध्या प्रकरणावर रमेशचंद्र त्रिपाठी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. पण अयोध्या वादावर कोर्टाच्या बाहेर चर्चेतून तोडगा शक्य नाही, असे प्रतिज्ञापत्र सुन्नी वक्फ बोर्डाने आज सुप्रीम कोर्टात दाखल केले. तर दुसरीकडे हा निकाल तीन महिने लांबणीवर टाका, अशी मागणी निर्मोही आखाड्याने केली आहे. निर्मोही आखाड्यानेही सुप्रीम कोर्टात आज याचिका दाखल केली. अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठात अयोध्येचा निकाल गेल्या शुक्रवारी लागणार होता. पण निकाल पुढे ढकलण्यासाठी रमेशचंद्र त्रिपाठी यांची याचिका कोर्टाने सुनावणीला घेतली. आणि उद्यापर्यंत निकालाला स्थगिती दिली. उद्या सरन्याधीशांच्या नेतृत्वाखालच्या तीन सदस्यांच्या खंडपीठात या याचिकेवरची सुनावणी होणार आहे. त्यानंतर अयोध्येचा निकाल कधी लागेल ते स्पष्ट होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 27, 2010 03:02 PM IST

अयोध्या याचिकेवर उद्या सुनावणी

27 सप्टेंबर

अयोध्या प्रकरणावर रमेशचंद्र त्रिपाठी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

पण अयोध्या वादावर कोर्टाच्या बाहेर चर्चेतून तोडगा शक्य नाही, असे प्रतिज्ञापत्र सुन्नी वक्फ बोर्डाने आज सुप्रीम कोर्टात दाखल केले. तर दुसरीकडे हा निकाल तीन महिने लांबणीवर टाका, अशी मागणी निर्मोही आखाड्याने केली आहे.

निर्मोही आखाड्यानेही सुप्रीम कोर्टात आज याचिका दाखल केली. अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठात अयोध्येचा निकाल गेल्या शुक्रवारी लागणार होता. पण निकाल पुढे ढकलण्यासाठी रमेशचंद्र त्रिपाठी यांची याचिका कोर्टाने सुनावणीला घेतली. आणि उद्यापर्यंत निकालाला स्थगिती दिली.

उद्या सरन्याधीशांच्या नेतृत्वाखालच्या तीन सदस्यांच्या खंडपीठात या याचिकेवरची सुनावणी होणार आहे. त्यानंतर अयोध्येचा निकाल कधी लागेल ते स्पष्ट होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2010 03:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close