S M L

कॉमनवेल्थच्या तयारीला तीन दिवसांची मुदतवाढ

28 सप्टेंबरकॉमनवेल्थ गेम्सच्या तयारीला आणखीन तिन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांनी ही घोषणा केली. कॉमनवेल्थ गेम्सला आता फक्त 5 दिवसच उरले आहेत. कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजमधील अस्वच्छतेवर या अगोदर अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे साफसफाईसाठी तसेच अपूर्ण बांधकामांसाठीची मुदत आणखीन तीन दिवसांनी वाढवण्यात आली आहे. त्यासाठी अतिरिक्त कामगारांची नेमणूक करण्यात आल्याचेही शिला दीक्षित यांनी सांगितले. तसेच नेहरु स्टेडियमच्या बाहेर कोसळलेल्या फुटओव्हर ब्रिजच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले. दरम्यान कॉमनवेल्थ गेम्सच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी दिल्लीत एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 28, 2010 10:57 AM IST

कॉमनवेल्थच्या तयारीला तीन दिवसांची मुदतवाढ

28 सप्टेंबर

कॉमनवेल्थ गेम्सच्या तयारीला आणखीन तिन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांनी ही घोषणा केली.

कॉमनवेल्थ गेम्सला आता फक्त 5 दिवसच उरले आहेत. कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजमधील अस्वच्छतेवर या अगोदर अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती.

त्यामुळे साफसफाईसाठी तसेच अपूर्ण बांधकामांसाठीची मुदत आणखीन तीन दिवसांनी वाढवण्यात आली आहे. त्यासाठी अतिरिक्त कामगारांची नेमणूक करण्यात आल्याचेही शिला दीक्षित यांनी सांगितले.

तसेच नेहरु स्टेडियमच्या बाहेर कोसळलेल्या फुटओव्हर ब्रिजच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले. दरम्यान कॉमनवेल्थ गेम्सच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी दिल्लीत एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 28, 2010 10:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close