S M L

दालमियांविरोधी खटले मागे घेणार

29 सप्टेंबरबीसीसीआयची 81वी वार्षिक सर्वसाधारण बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्याविरुद्ध मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेले सर्व खटलेही मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.दालमिया यांच्याविरुद्‌ध आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप ठेवण्यात आले होते. त्यामुळे दालमिया यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच आयपील गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदावरुन सुनिल गावसकर यांना वगळण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पण रवी शास्त्री मात्र आयपीएलच्या गवर्निंग कौन्सिलमध्ये कायम राहणार आहेत. आजच्या बैठकीत नव्याने आयपीएल कौन्सिलची नेमणूक करण्यात आली. चिराय अमिन हेच या समितीचे अध्यक्ष राहणार आहेत. तर राजीव शुक्ला, अनुराग ठाकूर, रंजीब बिस्वाल आणि अरुण जेटली या समितीचे सदस्य असतील. फारुख अब्दुल्ला आणि आय. एस. बिंद्रा यांनाही या समितीमधून वगळण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 29, 2010 09:07 AM IST

दालमियांविरोधी खटले मागे घेणार

29 सप्टेंबर

बीसीसीआयची 81वी वार्षिक सर्वसाधारण बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्याविरुद्ध मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेले सर्व खटलेही मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

दालमिया यांच्याविरुद्‌ध आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप ठेवण्यात आले होते. त्यामुळे दालमिया यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच आयपील गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदावरुन सुनिल गावसकर यांना वगळण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

पण रवी शास्त्री मात्र आयपीएलच्या गवर्निंग कौन्सिलमध्ये कायम राहणार आहेत. आजच्या बैठकीत नव्याने आयपीएल कौन्सिलची नेमणूक करण्यात आली. चिराय अमिन हेच या समितीचे अध्यक्ष राहणार आहेत.

तर राजीव शुक्ला, अनुराग ठाकूर, रंजीब बिस्वाल आणि अरुण जेटली या समितीचे सदस्य असतील. फारुख अब्दुल्ला आणि आय. एस. बिंद्रा यांनाही या समितीमधून वगळण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 29, 2010 09:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close