S M L

सचिन म्हणतो, नो सिनेमा...

29 सप्टेंबरमास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचे फेरारी प्रेम सगळ्यांनाच माहीत आहे. आपल्या गाड्यांच्या ताफ्यात फेरारी बाळगणारा सचिन हा एकमेव भारतीय क्रिकेटर आहे. आपल्या या फेरारी प्रेमामुळे सचिन आता चक्क बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याच्या तयारीत असल्याची बातमी होती. विधू विनोद चोप्राने 'फेरारी की सवारी' या नव्या सिनेमासाठी सचिनला गळ घातल्याची बातमी होती. गंमत म्हणजे सचिननेही काही महिन्यांपूर्वी विधू विनोद चोप्रांची भेट घेतली होती. आणि ट्ीवटरवर चोप्रांसोबत आपला फोटोही दिला होता. त्यामुळे त्याच्या सिनेमातील पदार्पणाची चर्चा रंगली होती. पण खुद्द सचिन तेंडुलकरने आता ट्ीवटरवर या बातमीबाबत खुलासा केला आहे. सचिन म्हणतो की, सर्वांनी विचारलेल्या प्रश्नाला माझे एकच उत्तर आहे की, मी कोणत्याही सिनेमात काम करत नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 29, 2010 10:31 AM IST

सचिन म्हणतो, नो सिनेमा...

29 सप्टेंबर

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचे फेरारी प्रेम सगळ्यांनाच माहीत आहे. आपल्या गाड्यांच्या ताफ्यात फेरारी बाळगणारा सचिन हा एकमेव भारतीय क्रिकेटर आहे.

आपल्या या फेरारी प्रेमामुळे सचिन आता चक्क बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याच्या तयारीत असल्याची बातमी होती. विधू विनोद चोप्राने 'फेरारी की सवारी' या नव्या सिनेमासाठी सचिनला गळ घातल्याची बातमी होती.

गंमत म्हणजे सचिननेही काही महिन्यांपूर्वी विधू विनोद चोप्रांची भेट घेतली होती. आणि ट्ीवटरवर चोप्रांसोबत आपला फोटोही दिला होता. त्यामुळे त्याच्या सिनेमातील पदार्पणाची चर्चा रंगली होती.

पण खुद्द सचिन तेंडुलकरने आता ट्ीवटरवर या बातमीबाबत खुलासा केला आहे. सचिन म्हणतो की, सर्वांनी विचारलेल्या प्रश्नाला माझे एकच उत्तर आहे की, मी कोणत्याही सिनेमात काम करत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 29, 2010 10:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close