S M L

नवी मुंबई विमानतळ स्थगितीची शिफारस

29 सप्टेंबरनवी मुंबई विमानतळाचे टेक ऑफ रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पर्यावरणविषयक समस्यांचे निराकरण होत नाही, तोपर्यंत हा प्रकल्प स्थगित करण्याची शिफारस पर्यावरण मंत्रालयाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने केली आहे.आयबीएन नेटवर्कला या तज्ज्ञ समितीचा अहवाल मिळाला आहे. सिडकोने विमानतळासाठी जागा निश्चित करताना वाडा, अनसोली, आणि कल्याणसारख्या पर्यायांचा अभ्यासच केला नाही असा ठपका या समितीने ठेवला आहे.त्याचबरोबर नवी मुंबई व्यतिरिक्त वर उल्लेख केलेल्या तीन जागा या विमानतळासाठी जास्त योग्य असतानाही त्याचा विचार सिडकोनं का केला नाही, असा प्रश्नही समितीने विचारला आहे.सिडकोने जास्त अभ्यास करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ समितीने व्यक्त केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 29, 2010 02:47 PM IST

29 सप्टेंबर

नवी मुंबई विमानतळाचे टेक ऑफ रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पर्यावरणविषयक समस्यांचे निराकरण होत नाही, तोपर्यंत हा प्रकल्प स्थगित करण्याची शिफारस पर्यावरण मंत्रालयाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने केली आहे.

आयबीएन नेटवर्कला या तज्ज्ञ समितीचा अहवाल मिळाला आहे. सिडकोने विमानतळासाठी जागा निश्चित करताना वाडा, अनसोली, आणि कल्याणसारख्या पर्यायांचा अभ्यासच केला नाही असा ठपका या समितीने ठेवला आहे.

त्याचबरोबर नवी मुंबई व्यतिरिक्त वर उल्लेख केलेल्या तीन जागा या विमानतळासाठी जास्त योग्य असतानाही त्याचा विचार सिडकोनं का केला नाही, असा प्रश्नही समितीने विचारला आहे.

सिडकोने जास्त अभ्यास करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ समितीने व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 29, 2010 02:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close