S M L

अयोध्येविषयी दावे-प्रतिदावे

30 सप्टेंबरअयोध्येचा निकाल आज लागणार आहे. अनेक वर्षांपासून चाललेला हा एक मोठा वाद आहे. वादग्रस्त जागी खरोखरच मंदिर होते का, यावरही अनेक दावे-प्रतिदावे आहेत. या वादाच्या इतिहासावर एक नजर टाकूया... बाबरचा प्रशासक मीर बाकीने खरेच राममंदिर पाडून त्या ठिकाणी 1528 मध्ये बाबरी मशीद बांधली? अयोध्येतल्या याच जागी भगवान रामाचा जन्म झाला हे सिद्ध करण्यासाठी काही पुरावे आहेत?भारतीय पुरातत्व विभागाने कोर्टात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे,"वादग्रस्त जागेवरच्या बांधकामाखालीच एक मोठे बांधकाम असल्याचे पुरावे आहेत. उत्खननात देव-देवतांच्या मूर्ती आणि 50 पिलर्सचा पायाही सापडलाय. हे सर्व बांधकाम उत्तर भारतातील मंदिरांसारखे आहे."पण पुरातत्व विभागाचा हा अहवाल संदिग्ध आणि विरोधाभास निर्माण करणारा असल्याचे सुन्नी वक्फ बोर्डाचे म्हणणे आहे. त्यांनी दोन प्रश्न उपस्थित केले आहेत. - हे बांधकाम कोणत्या काळातील आहे, हे सिद्ध करणारे काही पुरावे आहेत का?- आणि बाबरी मशीद बांधण्यासाठी मीर बाकीनेच मूळचे बांधकाम पाडले, याचे काही ऐतिहासिक पुरावे आहेत का?आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहास संशोधक डी. एन. झा हेसुद्धा 1991 मध्ये सरकारकडे सादर केलेल्या अहवालाचे सहलेखक होते. त्यांनीसुद्धा पुरातत्व विभागाच्या अहवालावर टीका केली आहे. झा आणि त्यांच्या सहकारी इतिहास संशोधकांचा दावा आहे,- पिलर्स हे काही मंदिर असल्याचे पुरावे नाहीत - याठिकाणी सापडलेली मातीची भांडी आणि प्राण्यांची हाडे यावरून या भागात मांस खाणारे मुस्लीम राहत होते, हेच दिसते- आणि पुरातत्व विभागाला सापडलेलं बांधकाम एखाद्या मशिदीचेही असू शकतेबाबरी मशीद बांधल्यानंतर केवळ 50 वर्षांनी तुलसीदासांनी 'रामचरीत मानस' लिहिले. पण त्यांनी त्यात राममंदिर पाडून मशीद बांधल्याचा कुठेच उल्लेख केला नाही. मीर बाकीने राममंदिर पाडले नाही, हे सिद्ध करण्यासाठी हा पुरावा पुरेसा असल्याचे इतिहास संशोधकांचे म्हणणे आहे. पण या जागेवरची मशीद बेकायदेशीर होती, कारण ती हिंदू पवित्र मानत असलेल्या जागेवर होती, असा हिंदू संघटनांचा दावा आहे. ही घटनाच 500 वर्षांपूर्वीची असल्याने प्रत्येक दाव्यावर प्रतिदावे आहेतच.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 30, 2010 10:30 AM IST

अयोध्येविषयी दावे-प्रतिदावे

30 सप्टेंबर

अयोध्येचा निकाल आज लागणार आहे. अनेक वर्षांपासून चाललेला हा एक मोठा वाद आहे. वादग्रस्त जागी खरोखरच मंदिर होते का, यावरही अनेक दावे-प्रतिदावे आहेत. या वादाच्या इतिहासावर एक नजर टाकूया...

बाबरचा प्रशासक मीर बाकीने खरेच राममंदिर पाडून त्या ठिकाणी 1528 मध्ये बाबरी मशीद बांधली? अयोध्येतल्या याच जागी भगवान रामाचा जन्म झाला हे सिद्ध करण्यासाठी काही पुरावे आहेत?

भारतीय पुरातत्व विभागाने कोर्टात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे,"वादग्रस्त जागेवरच्या बांधकामाखालीच एक मोठे बांधकाम असल्याचे पुरावे आहेत. उत्खननात देव-देवतांच्या मूर्ती आणि 50 पिलर्सचा पायाही सापडलाय. हे सर्व बांधकाम उत्तर भारतातील मंदिरांसारखे आहे."

पण पुरातत्व विभागाचा हा अहवाल संदिग्ध आणि विरोधाभास निर्माण करणारा असल्याचे सुन्नी वक्फ बोर्डाचे म्हणणे आहे. त्यांनी दोन प्रश्न उपस्थित केले आहेत.

- हे बांधकाम कोणत्या काळातील आहे, हे सिद्ध करणारे काही पुरावे आहेत का?

- आणि बाबरी मशीद बांधण्यासाठी मीर बाकीनेच मूळचे बांधकाम पाडले, याचे काही ऐतिहासिक पुरावे आहेत का?

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहास संशोधक डी. एन. झा हेसुद्धा 1991 मध्ये सरकारकडे सादर केलेल्या अहवालाचे सहलेखक होते. त्यांनीसुद्धा पुरातत्व विभागाच्या अहवालावर टीका केली आहे. झा आणि त्यांच्या सहकारी इतिहास संशोधकांचा दावा आहे,

- पिलर्स हे काही मंदिर असल्याचे पुरावे नाहीत

- याठिकाणी सापडलेली मातीची भांडी आणि प्राण्यांची हाडे यावरून या भागात मांस खाणारे मुस्लीम राहत होते, हेच दिसते

- आणि पुरातत्व विभागाला सापडलेलं बांधकाम एखाद्या मशिदीचेही असू शकते

बाबरी मशीद बांधल्यानंतर केवळ 50 वर्षांनी तुलसीदासांनी 'रामचरीत मानस' लिहिले. पण त्यांनी त्यात राममंदिर पाडून मशीद बांधल्याचा कुठेच उल्लेख केला नाही.

मीर बाकीने राममंदिर पाडले नाही, हे सिद्ध करण्यासाठी हा पुरावा पुरेसा असल्याचे इतिहास संशोधकांचे म्हणणे आहे.

पण या जागेवरची मशीद बेकायदेशीर होती, कारण ती हिंदू पवित्र मानत असलेल्या जागेवर होती, असा हिंदू संघटनांचा दावा आहे.

ही घटनाच 500 वर्षांपूर्वीची असल्याने प्रत्येक दाव्यावर प्रतिदावे आहेतच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 30, 2010 10:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close