S M L

मुसळधार पावसाचे पुण्यात 4 बळी

30 सप्टेंबरपुण्यात काल रात्री 10 ते 12 या दोन तासांत झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडाला.पावसाने अक्षरश: दाणादाण उडवली.कोथरूड भागात पाण्याच्या लोंढ्यामुळे संरक्षक भिंत फुटून कन्स्ट्रक्शन साईटजवळ राहणार्‍या मजुरांच्या झोपड्या वाहून गेल्या. त्यात नवरा बायकोसह त्यांची 2 लहान मुले असा एकूण 4 जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे सिंहगड रोडवर वडगाव बुद्रुक येथे पाण्यात विद्युतप्रवाह उतरल्याने शॉक बसून एका तरूणाचा मृत्यू झाला. शहराच्या विविध भागात सोसायट्या आणि झोपड्यांमधे पाणी शिरल्याच्याही अनेक घटना घडल्या. वारजे पुलाखालचा रस्ता वाहून गेला. या रस्त्याला ओढ्याचे स्वरूप येऊन वाहने वाहून गेली. अनेक चारचाकी गाड्यांचे यात प्रचंड नुकसान झाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 30, 2010 01:30 PM IST

मुसळधार पावसाचे पुण्यात 4 बळी

30 सप्टेंबर

पुण्यात काल रात्री 10 ते 12 या दोन तासांत झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडाला.पावसाने अक्षरश: दाणादाण उडवली.

कोथरूड भागात पाण्याच्या लोंढ्यामुळे संरक्षक भिंत फुटून कन्स्ट्रक्शन साईटजवळ राहणार्‍या मजुरांच्या झोपड्या वाहून गेल्या.

त्यात नवरा बायकोसह त्यांची 2 लहान मुले असा एकूण 4 जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे सिंहगड रोडवर वडगाव बुद्रुक येथे पाण्यात विद्युतप्रवाह उतरल्याने शॉक बसून एका तरूणाचा मृत्यू झाला.

शहराच्या विविध भागात सोसायट्या आणि झोपड्यांमधे पाणी शिरल्याच्याही अनेक घटना घडल्या. वारजे पुलाखालचा रस्ता वाहून गेला.

या रस्त्याला ओढ्याचे स्वरूप येऊन वाहने वाहून गेली. अनेक चारचाकी गाड्यांचे यात प्रचंड नुकसान झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 30, 2010 01:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close