S M L

'सलीम पटेलला ओळखत नाही'

1 ऑक्टोबरसलीम पटेलला आपण ओळखतच नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते नसीम सिद्दीकी यांनी म्हटले आहे. पुन्हा एकदा नसिम सिद्दीकी खोटे बोलत असल्याचे दिसून येत आहे. ज्या सलीम पटेलला ओळखत नसल्याचे नसिम सिद्दीकी सांगत आहेत, तो सलीम पटेल उर्फ सलीम गोवा गुटखा हा 2002 मध्ये मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून काम पाहत होता. तेव्हा त्याच वर्षी सलीम पटेलचे दाऊद टोळीशी असलेले संबंध उघडकीला आले होते. मुंबई राष्ट्रवादीचे तेव्हा अध्यक्ष होते, चंद्रकांत त्रिपाठी. या त्रिपाठींनी नसीम सिद्दीकींच्याच सांगण्यावरून सलीम पटेलला पक्षात स्थान दिले होते, असे म्हटले गेले होते. पण सलीमचे गुन्हेगारी जगताशी असलेले संबंध उघडकीला आल्यानंतर मुंबई राष्ट्रवादीची कार्यकारणीच बरखास्त केली गेली होती. नसीम सिद्दीकी 2001 मध्ये काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आले. सलीम पटेलची ही घटना घडली 2002 साली. ज्या माणसावरून पक्षाच्या मुंबई विभागाची कार्यकारणीच बरखास्त होते, तो माणूस आपल्याला माहीतच नाही, असा कांगावा मात्र सिद्दीकी यांनी केल्याचे म्हटले जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 1, 2010 11:21 AM IST

'सलीम पटेलला ओळखत नाही'

1 ऑक्टोबर

सलीम पटेलला आपण ओळखतच नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते नसीम सिद्दीकी यांनी म्हटले आहे. पुन्हा एकदा नसिम सिद्दीकी खोटे बोलत असल्याचे दिसून येत आहे.

ज्या सलीम पटेलला ओळखत नसल्याचे नसिम सिद्दीकी सांगत आहेत, तो सलीम पटेल उर्फ सलीम गोवा गुटखा हा 2002 मध्ये मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून काम पाहत होता.

तेव्हा त्याच वर्षी सलीम पटेलचे दाऊद टोळीशी असलेले संबंध उघडकीला आले होते. मुंबई राष्ट्रवादीचे तेव्हा अध्यक्ष होते, चंद्रकांत त्रिपाठी.

या त्रिपाठींनी नसीम सिद्दीकींच्याच सांगण्यावरून सलीम पटेलला पक्षात स्थान दिले होते, असे म्हटले गेले होते.

पण सलीमचे गुन्हेगारी जगताशी असलेले संबंध उघडकीला आल्यानंतर मुंबई राष्ट्रवादीची कार्यकारणीच बरखास्त केली गेली होती.

नसीम सिद्दीकी 2001 मध्ये काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आले. सलीम पटेलची ही घटना घडली 2002 साली.

ज्या माणसावरून पक्षाच्या मुंबई विभागाची कार्यकारणीच बरखास्त होते, तो माणूस आपल्याला माहीतच नाही, असा कांगावा मात्र सिद्दीकी यांनी केल्याचे म्हटले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2010 11:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close