S M L

बुधवारच्या पावसाचा पुण्याला फटका

1 ऑक्टोबरपुण्यात बुधवारी झालेल्या जोरदार पावसाचा मोठा फटका बसला आहे. नाल्यांचे प्रवाह बदलल्यामुळेच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांनी सांगितले आहे. पुरात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना सरकारकडून 1 लाख रुपयांची मदतही जाहीर झाल्याची माहिती त्यांनी दिली. यापूर्वीही नाल्यांच्या प्रश्नामुळे पुणेकरांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. अनधिकृत बांधकामे आणि नाले बुजवण्याच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधिशांची समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. हा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवला असून त्यांच्याकडे तो प्रलंबितच आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त महेश झगडे यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 1, 2010 11:34 AM IST

बुधवारच्या पावसाचा पुण्याला फटका

1 ऑक्टोबर

पुण्यात बुधवारी झालेल्या जोरदार पावसाचा मोठा फटका बसला आहे. नाल्यांचे प्रवाह बदलल्यामुळेच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांनी सांगितले आहे.

पुरात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना सरकारकडून 1 लाख रुपयांची मदतही जाहीर झाल्याची माहिती त्यांनी दिली.

यापूर्वीही नाल्यांच्या प्रश्नामुळे पुणेकरांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले होते.

अनधिकृत बांधकामे आणि नाले बुजवण्याच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधिशांची समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती.

हा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवला असून त्यांच्याकडे तो प्रलंबितच आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त महेश झगडे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2010 11:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close