S M L

लातूरच्या गुराख्यांची गाई-म्हशींबरोबर दिवाळी

28 ऑक्टोबर, लातूर - राज्यभरात दिवाळी उत्साहानं साजरी केली जात आहे. दिवाळी साजरी करण्याचं स्वरुप मात्र वेगळं असतं. लातुरध्ये गवताच्या काड्यांपासून बनवलेल्या दागिन्यांनी गाई म्हशींना सजवलं जातं. गाई म्हशींना सजवल्यानंतर त्यांना खास गवतापासून बनवलेल्या दिवटीनं ओवाळं जातं.लातूर जिल्ह्यातील वाढवण इथे राहणारे सुरेश जगताप स्वत:च्या गायी म्हशींसाठी दागिने तयार करतात. ते म्हणतात, 'या दागिन्यांसाठी मी रानातल्या विशिष्ट प्रकारच्या गवतांचा वापर करतो. जास्त करुन मी त्यात लव्हाळी आणि म्हवटाळ गवतांचा वापर करतो. हाताच्या बोटांनी सुंदर विणकाम केलेल्या तीन पणतीच्या दिवटीमध्ये शेणाचा दिवा ठेवून जनावरांची संध्याकाळी पूजा केली जाते'.गायी म्हशींच्या सजावटीसाठी सहज उपलब्ध होणा-या या गवताचा वापर करून कमरपट्टा, माळ, चंद्रहारासारखे दागिने बनवले जातात. माणसांप्रमाणेच सुंदर दिसण्याची इच्छा या प्राण्यांना असते. अशा प्रकारचे दागिने बनवून ती इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न ग्रामीण भागातला शेतकरी करत असतो. राज्यकर्त्यांच्या आणि निसर्गाच्या कोपाला बळी पडलेला शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पण मुक्या जनावरांच्या आनंदात निदान काही काळ तरी तो आपलं दु:ख विसरतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 28, 2008 11:39 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 28, 2008 11:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close