S M L

दगडूशेठ गणेशमंदिरासमोर 40 लाखांची लूट

2 ऑक्टोबरबंदुक आणि चाकू चा धाक दाखवून तब्बल 40 लाख रुपयांची लूट केल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील प्रसिध्द दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोरच्या तिरंगा भवन कॉम्पेलेक्समध्ये ही चोरी झाली.काल दुपारी साडेतीनच्या सुमारास राजेश पटेल आपल्या मनी ट्रान्सफरींगच्या ऑफीसमध्ये पैसे मोजत होते. त्याच वेळेस चार अज्ञात तरुण कार्यालयात दाखल झाले. त्यांनी कर्मचार्‍यांना मारहाण केली आणि बंदुकीचा धाक दाखवत या कर्मचार्‍यांकडून 45 लाखांची रक्कम हिसकावून घेतली. त्यानंतर या तरुणांनी कर्मचार्‍यांना आत कोंडून तेथून पळ काढला. विशेष म्हणजे या कॉम्पलेक्सपासून हाकेच्या अंतरावर फरास खाना आणि विश्रामबाग या दोन पोलीस चौक्या आहेत. भरदिवसा हा प्रकार घडल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 2, 2010 01:20 PM IST

दगडूशेठ गणेशमंदिरासमोर 40 लाखांची लूट

2 ऑक्टोबर

बंदुक आणि चाकू चा धाक दाखवून तब्बल 40 लाख रुपयांची लूट केल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील प्रसिध्द दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोरच्या तिरंगा भवन कॉम्पेलेक्समध्ये ही चोरी झाली.

काल दुपारी साडेतीनच्या सुमारास राजेश पटेल आपल्या मनी ट्रान्सफरींगच्या ऑफीसमध्ये पैसे मोजत होते. त्याच वेळेस चार अज्ञात तरुण कार्यालयात दाखल झाले. त्यांनी कर्मचार्‍यांना मारहाण केली आणि बंदुकीचा धाक दाखवत या कर्मचार्‍यांकडून 45 लाखांची रक्कम हिसकावून घेतली.

त्यानंतर या तरुणांनी कर्मचार्‍यांना आत कोंडून तेथून पळ काढला. विशेष म्हणजे या कॉम्पलेक्सपासून हाकेच्या अंतरावर फरास खाना आणि विश्रामबाग या दोन पोलीस चौक्या आहेत.

भरदिवसा हा प्रकार घडल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 2, 2010 01:20 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close