S M L

राज्याचे दूध धोरण बदलावे - पाचपुते

4 ऑक्टोबरअहमदनगरमधील दूध भेसळ आणि सिंथेटिक दुधाच्या रॅकेटचे धागेदोरे राज्यातील राजकीय नेत्यांच्या संस्थांपर्यत जाऊन पोहोचल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. पण या प्रकारामुळे अहमदनगरमधील दुग्ध व्यवसाय अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. दुधाची डिग्री 8 च्यावर मिळायला हवी, असा सरकारी नियम आहे. त्यामुळेच दूध भेसळीसारखे प्रकार वाढत असतील, तर या सगळ्याची जबाबदारी राज्याच्या धोरणावरच येते. त्यासाठी हे धोरणच बदलण्याची आवश्यकता असल्याचे अहमदनगरचे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी म्हटले आहे. नगरमध्ये दूध संचालकांची आढावा बैठक पाचपुते यांनी घेतली. पोलीस करत असलेली कारवाई योग्य आहे. पण केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा कायदा 2006 नुसार ही कारवाई व्हावी, अशी मागणीही पालकमंत्र्यांनी केली आहे. दूधभेसळीमागे नेमके काय कारण आहे ते पाहूया... दुधाची डिग्री तपासण्यासाठी 2001 पूर्वी लॅक्टोमीटरने तपासणी व्हायची. त्यानंतर केंद्राचे नियम बदलले आणि डेन्सीटीमीटरने दुधाची डिग्री तपासली जाऊ लागली. त्यामुळे 0.7 ने डिग्री खालावली. विभागवार प्रत्यक्ष दूध प्रत न तपासताच सरसकट दूधखरेदी करण्यात आली. त्याचा फटका दूधउत्पादकांना बसला. 3.5 फॅट आणि 8 पेक्षा जास्त एसएनएफ साठी उत्पादकांची धावपळ आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2010 10:10 AM IST

राज्याचे दूध धोरण बदलावे - पाचपुते

4 ऑक्टोबर

अहमदनगरमधील दूध भेसळ आणि सिंथेटिक दुधाच्या रॅकेटचे धागेदोरे राज्यातील राजकीय नेत्यांच्या संस्थांपर्यत जाऊन पोहोचल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

पण या प्रकारामुळे अहमदनगरमधील दुग्ध व्यवसाय अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. दुधाची डिग्री 8 च्यावर मिळायला हवी, असा सरकारी नियम आहे.

त्यामुळेच दूध भेसळीसारखे प्रकार वाढत असतील, तर या सगळ्याची जबाबदारी राज्याच्या धोरणावरच येते. त्यासाठी हे धोरणच बदलण्याची आवश्यकता असल्याचे अहमदनगरचे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी म्हटले आहे.

नगरमध्ये दूध संचालकांची आढावा बैठक पाचपुते यांनी घेतली. पोलीस करत असलेली कारवाई योग्य आहे. पण केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा कायदा 2006 नुसार ही कारवाई व्हावी, अशी मागणीही पालकमंत्र्यांनी केली आहे.

दूधभेसळीमागे नेमके काय कारण आहे ते पाहूया...

दुधाची डिग्री तपासण्यासाठी 2001 पूर्वी लॅक्टोमीटरने तपासणी व्हायची. त्यानंतर केंद्राचे नियम बदलले आणि डेन्सीटीमीटरने दुधाची डिग्री तपासली जाऊ लागली.

त्यामुळे 0.7 ने डिग्री खालावली. विभागवार प्रत्यक्ष दूध प्रत न तपासताच सरसकट दूधखरेदी करण्यात आली.

त्याचा फटका दूधउत्पादकांना बसला. 3.5 फॅट आणि 8 पेक्षा जास्त एसएनएफ साठी उत्पादकांची धावपळ आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2010 10:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close