S M L

भारतीय स्वीमर्सचीही आगेकूच

4 ऑक्टोबरभारतीय स्वीमर्सनी विजयी कामगिरी करत 4 बाय 100 मीटर फ्री स्टाईल स्वीमिंगच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भारतीय टीमकडून आता मोठ्या अपेक्षा बाळगल्या जात आहेत.भारतीय टीममध्ये वीरधवल खाडे, ऍरॉन डिसोझा, अरुण जयप्रकाश आणि अंशुल कोठारीचा समावेश आहे. भारतीय टीमने तीन मिनीट 28 सेकंदाची वेळ नोंदवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्यांदाच भारताने फायनल गाठली आहे. त्याचबरोबर 50 मीटर बॅकस्ट्रोकच्या पुरुष गटात बदि्रनाथ मेलकोटेने 27.52 सेकंदाची वेळ नोंदवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पण दुसरीकडे मात्र इतर भारतीय स्वीमर्सची कामगिरी निराशाजनक राहिली. सुरभी टिपरे, आरती घोरपडे, मंदार दिवासे, उलालमठ गगन, रेयान पोंचा आणि तरूण तोकस यांचे आव्हान पहिल्या राऊंडमध्येच संपुष्टात आले.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2010 10:27 AM IST

भारतीय स्वीमर्सचीही आगेकूच

4 ऑक्टोबर

भारतीय स्वीमर्सनी विजयी कामगिरी करत 4 बाय 100 मीटर फ्री स्टाईल स्वीमिंगच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

त्यामुळे भारतीय टीमकडून आता मोठ्या अपेक्षा बाळगल्या जात आहेत.

भारतीय टीममध्ये वीरधवल खाडे, ऍरॉन डिसोझा, अरुण जयप्रकाश आणि अंशुल कोठारीचा समावेश आहे.

भारतीय टीमने तीन मिनीट 28 सेकंदाची वेळ नोंदवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्यांदाच भारताने फायनल गाठली आहे.

त्याचबरोबर 50 मीटर बॅकस्ट्रोकच्या पुरुष गटात बदि्रनाथ मेलकोटेने 27.52 सेकंदाची वेळ नोंदवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

पण दुसरीकडे मात्र इतर भारतीय स्वीमर्सची कामगिरी निराशाजनक राहिली. सुरभी टिपरे, आरती घोरपडे, मंदार दिवासे, उलालमठ गगन, रेयान पोंचा आणि तरूण तोकस यांचे आव्हान पहिल्या राऊंडमध्येच संपुष्टात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2010 10:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close