S M L

मुख्यमंत्र्यांचे अजित पवारांना उत्तर

4 ऑक्टोबरकृष्णा खोरे पाणी वाटपाचा तिढा सोडवण्यास कॉंग्रेसचा एक नेता विरोध करतोय असा आरोप ऊर्जामंत्री अजितदादा पवार यांनी काल उस्मानाबादमध्ये केला होता. त्यास प्रत्युत्तर देताना ही मुख्यमंत्र्यांनी आज मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला मिळण्यात समन्वयाने तोडगा काढण्यात येईल असे सांगितले आहे. शिवाय त्यात काही अडचण असेल तर मुख्यमंत्री या नात्याने आपण त्यातून मार्ग काढू, या शब्दात मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना प्रत्युत्तर दिले आहे.तसेच मराठवाड्यातील नेतेच मराठवाड्याच्या विकासाला मारक ठरलेत, असा आरोप अजित पवार यांनी केला होता. हा आरोप मुख्यमंत्र्यांनी खोडून काढला आहे. हे ऐकल्यावर अजित पवारांनीही पुन्हा मुख्यमंत्र्यांना त्यांच्या शैलीत टोला लगावला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2010 11:49 AM IST

मुख्यमंत्र्यांचे अजित पवारांना उत्तर

4 ऑक्टोबर

कृष्णा खोरे पाणी वाटपाचा तिढा सोडवण्यास कॉंग्रेसचा एक नेता विरोध करतोय असा आरोप ऊर्जामंत्री अजितदादा पवार यांनी काल उस्मानाबादमध्ये केला होता.

त्यास प्रत्युत्तर देताना ही मुख्यमंत्र्यांनी आज मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला मिळण्यात समन्वयाने तोडगा काढण्यात येईल असे सांगितले आहे.

शिवाय त्यात काही अडचण असेल तर मुख्यमंत्री या नात्याने आपण त्यातून मार्ग काढू, या शब्दात मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना प्रत्युत्तर दिले आहे.

तसेच मराठवाड्यातील नेतेच मराठवाड्याच्या विकासाला मारक ठरलेत, असा आरोप अजित पवार यांनी केला होता. हा आरोप मुख्यमंत्र्यांनी खोडून काढला आहे.

हे ऐकल्यावर अजित पवारांनीही पुन्हा मुख्यमंत्र्यांना त्यांच्या शैलीत टोला लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2010 11:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close