S M L

सेनेच्या दबावामुळे विद्यापीठाने पुस्तक वगळले

4 ऑक्टोबरशिवसेनेच्या दबावामुळे मुंबई विद्यापीठाला बीएच्या अभ्यासक्रमातून एक पुस्तक वगळावे लागले आहे. रोहिंटन मिस्त्री यांच्या बुकरसाठी नामांकन झालेल्या 'सच ए लाँग जर्नी' या पुस्तकावर शिवसेनेने आक्षेप घेतला होता. आता अचानक हे पुस्तक वगळल्यामुळे प्राध्यापकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विद्यापीठाच्या दीडशे वर्षात अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. आणि यासाठी कारण आहेत, शिवसेनेचे युवा नेता आदित्य ठाकरे. स्वत: विद्यार्थी असणार्‍या आदित्य ठाकरेंनी या पुस्तकातील काही भाग शिवसेनेबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा असल्याचे पक्षाच्या निदर्शनास आणून दिले. हे पुस्तक 2007 पासून बीएच्या अभ्यासक्रमात होते. आता विद्यापीठाने राजकीय दबावाला बळी पडून पुस्तक वगळल्याने प्राध्यापक संतापले आहेत. पुस्तक बदलल्याने परीक्षा पुढे ढकलाव्या लागतील, असे त्यांचे म्हणणे आहे.कुलगुरूकडे निषेधाचा मोर्चा नेण्याची तयारीही शिक्षक संघटनेने केली आहे. पण हे पुस्तक वगळण्यास भाग पाडणारे आदित्य ठाकरे आपले आजोबा आणि वडील यांच्याच पावलावर पाऊल टाकत असल्याचे दिसत आहे. आणि यानिमित्ताने राजकारणातील त्यांची 'लाँग जर्नी' सुरू झाल्याचे हे संकेतही मिळाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2010 03:09 PM IST

सेनेच्या दबावामुळे विद्यापीठाने पुस्तक वगळले

4 ऑक्टोबर

शिवसेनेच्या दबावामुळे मुंबई विद्यापीठाला बीएच्या अभ्यासक्रमातून एक पुस्तक वगळावे लागले आहे. रोहिंटन मिस्त्री यांच्या बुकरसाठी नामांकन झालेल्या 'सच ए लाँग जर्नी' या पुस्तकावर शिवसेनेने आक्षेप घेतला होता. आता अचानक हे पुस्तक वगळल्यामुळे प्राध्यापकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विद्यापीठाच्या दीडशे वर्षात अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. आणि यासाठी कारण आहेत, शिवसेनेचे युवा नेता आदित्य ठाकरे. स्वत: विद्यार्थी असणार्‍या आदित्य ठाकरेंनी या पुस्तकातील काही भाग शिवसेनेबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा असल्याचे पक्षाच्या निदर्शनास आणून दिले.

हे पुस्तक 2007 पासून बीएच्या अभ्यासक्रमात होते. आता विद्यापीठाने राजकीय दबावाला बळी पडून पुस्तक वगळल्याने प्राध्यापक संतापले आहेत. पुस्तक बदलल्याने परीक्षा पुढे ढकलाव्या लागतील, असे त्यांचे म्हणणे आहे.

कुलगुरूकडे निषेधाचा मोर्चा नेण्याची तयारीही शिक्षक संघटनेने केली आहे. पण हे पुस्तक वगळण्यास भाग पाडणारे आदित्य ठाकरे आपले आजोबा आणि वडील यांच्याच पावलावर पाऊल टाकत असल्याचे दिसत आहे. आणि यानिमित्ताने राजकारणातील त्यांची 'लाँग जर्नी' सुरू झाल्याचे हे संकेतही मिळाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2010 03:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close