S M L

भारताचे गोल्डन शूटिंग...

5 ऑक्टोबरकॉमनवेल्थ स्पर्धेत शूटिंगमध्ये अपेक्षेप्रमाणेच भारताची कामगिरी अव्वल होत आहे. आतापर्यंत पेअर इव्हेंटमध्ये भारताने शूटिंगमध्ये दोन गोल्ड आणि एका सिल्व्हर मेडलची कमाई केली आहे. अभिनव आणि गगन नारंग पाठोपाठ महिलांमध्ये अनिसा सय्यद आणि राही सरनौबतनेही अचूक नेम साधला. 25 मीटर पिस्टल इव्हेंटमध्ये त्यांनी भारताला दुसरे गोल्ड मिळवून दिले. दोघांची ही पहिलीच कॉमनवेल्थ स्पर्धा होती. त्यापूर्वी पहिले गोल्ड भारताने मिळवले ते दहा मीटर एअर रायफल प्रकारात. अभिनव बिंद्रा आणि गगन नारंग या भारताच्या टॉप जोडीने 1200 पैकी 1193 पॉइंट मिळवत पेअर इव्हेंटमध्ये अव्वल क्रमांक पटकावला. गगन नारंगने सहाशेपैकी 598 पॉइंट्स मिळवले. तर अभिनवने 595 पॉइंट्स पटकावले. दोघांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये नवा रेकॉर्डही रचला. 50 मीटर पिस्टल प्रकारात मात्र भारताला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावे लागले.चांगल्या कामगिरीचा प्रयत्नगोल्ड जिंकल्यानंतर अभिनव बिंद्राने दिलेली पहिली प्रतिक्रिया अशी होती... ''कॉमनवेल्थ स्पर्धेत खेळायला मी खुप उत्सुक होतो. भारतासाठी खेळताना मी नेहमीच सर्वोत्तम खेळण्याचा प्रयत्न करतो. गगन नारंगची कामगिरीही अप्रतिम झाली. दोघांनी मिळून भारताला पहिले गोल्ड मिळवून दिले याचा आनंद वाटतो. आता उद्या इंडिव्हिज्युअल इव्हेंटमध्येही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन.'' कुस्तीतही मेडल्स पक्केशूटिंगमध्ये नेमबाज अचूक नेम साधत असताना कुस्तीतही भारताची तीन मेडल्स पक्की झाली आहेत. ग्रीको रोमन प्रकारात अनिल कुमार, रविंदर सिंग आणि संजय कुमार यांनी आपापल्या गटात फायनलमध्ये धडक मारली आहे. फायनल मॅचही आज दुपारी होणार आहेत. यात 96 किलो वजनी गटात अनिल कुमार, 60 किलो वजनी गटात रविंदर सिंग तर 74 किलो वजनी गटात संजय कुमार लढत देईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 5, 2010 07:46 AM IST

भारताचे गोल्डन शूटिंग...

5 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ स्पर्धेत शूटिंगमध्ये अपेक्षेप्रमाणेच भारताची कामगिरी अव्वल होत आहे. आतापर्यंत पेअर इव्हेंटमध्ये भारताने शूटिंगमध्ये दोन गोल्ड आणि एका सिल्व्हर मेडलची कमाई केली आहे.

अभिनव आणि गगन नारंग पाठोपाठ महिलांमध्ये अनिसा सय्यद आणि राही सरनौबतनेही अचूक नेम साधला. 25 मीटर पिस्टल इव्हेंटमध्ये त्यांनी भारताला दुसरे गोल्ड मिळवून दिले. दोघांची ही पहिलीच कॉमनवेल्थ स्पर्धा होती.

त्यापूर्वी पहिले गोल्ड भारताने मिळवले ते दहा मीटर एअर रायफल प्रकारात. अभिनव बिंद्रा आणि गगन नारंग या भारताच्या टॉप जोडीने 1200 पैकी 1193 पॉइंट मिळवत पेअर इव्हेंटमध्ये अव्वल क्रमांक पटकावला. गगन नारंगने सहाशेपैकी 598 पॉइंट्स मिळवले. तर अभिनवने 595 पॉइंट्स पटकावले.

दोघांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये नवा रेकॉर्डही रचला. 50 मीटर पिस्टल प्रकारात मात्र भारताला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावे लागले.

चांगल्या कामगिरीचा प्रयत्न

गोल्ड जिंकल्यानंतर अभिनव बिंद्राने दिलेली पहिली प्रतिक्रिया अशी होती... ''कॉमनवेल्थ स्पर्धेत खेळायला मी खुप उत्सुक होतो. भारतासाठी खेळताना मी नेहमीच सर्वोत्तम खेळण्याचा प्रयत्न करतो. गगन नारंगची कामगिरीही अप्रतिम झाली. दोघांनी मिळून भारताला पहिले गोल्ड मिळवून दिले याचा आनंद वाटतो. आता उद्या इंडिव्हिज्युअल इव्हेंटमध्येही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन.''

कुस्तीतही मेडल्स पक्के

शूटिंगमध्ये नेमबाज अचूक नेम साधत असताना कुस्तीतही भारताची तीन मेडल्स पक्की झाली आहेत. ग्रीको रोमन प्रकारात अनिल कुमार, रविंदर सिंग आणि संजय कुमार यांनी आपापल्या गटात फायनलमध्ये धडक मारली आहे.

फायनल मॅचही आज दुपारी होणार आहेत. यात 96 किलो वजनी गटात अनिल कुमार, 60 किलो वजनी गटात रविंदर सिंग तर 74 किलो वजनी गटात संजय कुमार लढत देईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2010 07:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close