S M L

पुण्यात जोरदार पाऊस

5 ऑक्टोबरपुण्यात आता पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. काल रात्रीही मुसळधार पाऊस झाला. यामध्ये दोघांचा बळी गेला. शहरात जागोजागी पाणी साचले आहे. पाषाण येथील सूस रस्त्यावर एनसीएलची कम्पाऊंड वॉल मजुरांवर कोसळली. या दुर्घटनेत दोन मजूर ठार झाले. तर एक जण जखमी झाला. प्रचंड पावसामुळे शहरातील रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप आले होते. रात्री आठ वाजता पाऊस सुरू झाला. रात्री दहा वाजेपर्यंत जवळपास 25 हून जास्त ठिकाणी पाणी घुसल्याच्या तक्रारी फायर ब्रिगडेकडे नोंदवण्यात आल्या होत्या. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने पुण्याचे पालिका आयुक्त महेश झगडे यांच्या सरकारी निवासस्थानाच्या कंपाऊंडची भिंत कोसळली. यात झगडे यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 5, 2010 11:05 AM IST

पुण्यात जोरदार पाऊस

5 ऑक्टोबर

पुण्यात आता पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. काल रात्रीही मुसळधार पाऊस झाला. यामध्ये दोघांचा बळी गेला. शहरात जागोजागी पाणी साचले आहे.

पाषाण येथील सूस रस्त्यावर एनसीएलची कम्पाऊंड वॉल मजुरांवर कोसळली. या दुर्घटनेत दोन मजूर ठार झाले. तर एक जण जखमी झाला. प्रचंड पावसामुळे शहरातील रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप आले होते. रात्री आठ वाजता पाऊस सुरू झाला.

रात्री दहा वाजेपर्यंत जवळपास 25 हून जास्त ठिकाणी पाणी घुसल्याच्या तक्रारी फायर ब्रिगडेकडे नोंदवण्यात आल्या होत्या.

काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने पुण्याचे पालिका आयुक्त महेश झगडे यांच्या सरकारी निवासस्थानाच्या कंपाऊंडची भिंत कोसळली. यात झगडे यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2010 11:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close