S M L

बॉलिवूडचा दिवाळी धमाका

28 ऑक्टोबर, मुंबई - दिवाळीच्या निमित्तानं सिनेरसिकांसाठी बुधवारी दोन सिनेमे रिलिज होत आहेत. 'गोलमाल रिटर्न' आणि 'फॅशन' हे दोन सिनेमे रिलिज होत आहेत. 'फॅशन' हा दिग्दर्शक मधुर भांडारकरचा बहुचर्चित सिनेमा आहे. त्यात अरबाझ खान, कंगना राणावत, किटू गिडवानी, मुग्धा गोडसे आणि प्रियांका चोप्रा अशी बडी स्टारकास्ट सिनेमात आहेत. प्रियांका चोप्रा यात एका मॉडेलचा रोल करत आहे. त्या मॉडेलला कमी वेळेत झटपट यश मिळवून सुपर मॉडेल बनायचं असतं. कंगना राणावत आणि मुग्धा गोडसे यांनीही सिनेमात मॉडेलचं काम केलं आहे. पण त्यांच्याही वेगळ्या कथा आहेत. नेहमीप्रमाणेच सिनेमा रिलिज होण्याआधी सिनेमातील गाणी गाजतात. तसं 'फॅशन'चंही झालं आहे. सिनेमाला सलीम मर्चंट यांनी संगीत दिलंआहे.'गोलमाल रिटर्न्स' हा नावावरुनच धमाल सिनेमा असणार आहे. 'गोलमाल रिटर्न्स' हा सिनेमा म्हणजे 'गोलमाल'चा सिक्वेल आहे. जुन्या 'गोलमाल' मधील अजय देवगण, अर्शद वारसी आणि तुषार कपूर या कलाकारांबरोबर करिना कपूर आणि अमृता अरोरा आहेत तर शर्मन जोशीच्या जागी मराठामोळा श्रेयस तळपदे दिसणार आहे. या सिनेमात अजय देवगणबरोबर करीना कपूर दिसणार आहे. तिच्या व्यक्तिरेखेचं नाव एकदम इंटरेस्टिंग आहे आणि ते म्हणजे 'एकता'. सिनेमातल्या 'एकता' चा भाऊ अर्थातच तुषार कपूर. जुन्या 'गोलमाल' प्रमाणेच तुषार कपूर यात बावळट कॅरेक्टर साकारताना दिसणार आहे. 'गोलमाल रिटर्न्स' चं दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केलं आहे. ज्याप्रमाणे 'गोलमाल' हिट ठरला, त्याप्रमाणेच 'गोलमाल रिटर्न्स'ही हिट ठरेल की नाही, ते पाहावं लागेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 28, 2008 12:28 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 28, 2008 12:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close