S M L

नाशिकमध्ये जेसीबीखाली दोन मुलांचा मृत्यू

5 ऑक्टोबरनाशिकजवळ सारूळमध्ये एका जेसीबीखाली दोन लहान मुले चिरडली गेली आहेत. जमुना स्टोन क्रशिंग साईटवर मध्यरात्री दोन वाजता ही घटना घडली. साईटवरचे मजूर भाऊ लचके यांची काळू आणि जयवंती ही दोन मुले अंगणात झोपली होती. रात्री साईटवर आलेला जेसीबी त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. काळू हा 8 वर्षांचा होता आणि जयवंती 6 वर्षांची होती. साईटवर काम करणार्‍या मजुराच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेची कुठलीही काळजी यावेळी घेण्यात आली नव्हती. तसेच बेदरकार जेसीबी चालवून या निष्पाप मुलांचा बळी घेणार्‍या जेसीबीच्या ड्रायव्हरही कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. घटनेनंतर 12 तास उलटले तरी वाडिवर्‍हे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला नव्हता.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 5, 2010 02:28 PM IST

नाशिकमध्ये जेसीबीखाली दोन मुलांचा मृत्यू

5 ऑक्टोबर

नाशिकजवळ सारूळमध्ये एका जेसीबीखाली दोन लहान मुले चिरडली गेली आहेत. जमुना स्टोन क्रशिंग साईटवर मध्यरात्री दोन वाजता ही घटना घडली.

साईटवरचे मजूर भाऊ लचके यांची काळू आणि जयवंती ही दोन मुले अंगणात झोपली होती.

रात्री साईटवर आलेला जेसीबी त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. काळू हा 8 वर्षांचा होता आणि जयवंती 6 वर्षांची होती.

साईटवर काम करणार्‍या मजुराच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेची कुठलीही काळजी यावेळी घेण्यात आली नव्हती.

तसेच बेदरकार जेसीबी चालवून या निष्पाप मुलांचा बळी घेणार्‍या जेसीबीच्या ड्रायव्हरही कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.

घटनेनंतर 12 तास उलटले तरी वाडिवर्‍हे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला नव्हता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2010 02:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close