S M L

कल्याण-डोंबिवलीतील खड्डे मनसेच्या अजेंड्यावर

5 ऑक्टोबरकल्याण-डोंबिवलीतल्या रस्त्यांवर पडलेले त्या रस्त्यांचे कंत्राटदारच बुजवतील. आमचा कुठलाही कार्यकर्ता हे खड्डे बुजवणार नाही, असे सांगून राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे. जाहीरनाम्यात खड्‌ड्यांचाच मुद्दा प्रमुख असेल, असेही त्यांनी सांगितले आहे. येथील निवडणूक झाल्यानंतर पुढचा महापौर हा मनसेचाच असेल, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. आता कल्याण-डोंबिवली महापालिका हेच माझे लक्ष्य आहे. त्यानंतर नाशिक आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसह येणार्‍या प्रत्येक निवडणुका या माझ्यासाठी फोकस असतील, असे राज यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार नीलकंठ खाडीलकर यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 5, 2010 02:51 PM IST

कल्याण-डोंबिवलीतील खड्डे मनसेच्या अजेंड्यावर

5 ऑक्टोबर

कल्याण-डोंबिवलीतल्या रस्त्यांवर पडलेले त्या रस्त्यांचे कंत्राटदारच बुजवतील.

आमचा कुठलाही कार्यकर्ता हे खड्डे बुजवणार नाही, असे सांगून राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे.

जाहीरनाम्यात खड्‌ड्यांचाच मुद्दा प्रमुख असेल, असेही त्यांनी सांगितले आहे.

येथील निवडणूक झाल्यानंतर पुढचा महापौर हा मनसेचाच असेल, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

आता कल्याण-डोंबिवली महापालिका हेच माझे लक्ष्य आहे.

त्यानंतर नाशिक आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसह येणार्‍या प्रत्येक निवडणुका या माझ्यासाठी फोकस असतील, असे राज यांनी सांगितले.

ज्येष्ठ पत्रकार नीलकंठ खाडीलकर यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2010 02:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close