S M L

पाच 'गोल्ड'ची कमाई...

5 ऑक्टोबरकॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने कुस्तीत आज तीन गोल्ड मेडल जिंकली. ग्रीको रोमन प्रकारात अनिल कुमार, रविंदर सिंग आणि संजयने गोल्डन कामगिरी केली. 96 किलो वजनी गटात भारताच्या अनिल कुमारने गोल्ड मेडलवर कब्जा केला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या फकेरी हसेनचा पराभव केला. याआधी रविंदरने 60 किलो वजनी गटात भारताला पहिले गोल्ड मेडल जिंकून दिले. त्याने इंग्लंडच्या टेरेन्स बॉसनचा एकतर्फी लढतीत 7-0 ने पराभव केला. 74 किलो गटात संजयला दक्षिण आफ्रिकेच्या रिचर्ड ऍडिनलने कडवी झुंज दिली. दोन्ही डावात संजयला एक - एक पॉईंट घेता आला. संजयने नेटाने झुंज देत गोल्ड पटकावले.शूटिंगमधील आगेकूच सुरूकॉमनवेल्थ स्पर्धेत शूटिंगमध्ये अपेक्षेप्रमाणेच भारताची कामगिरी अव्वल होत आहे. आतापर्यंत पेअर इव्हेंटमध्ये भारताने शूटिंगमध्ये दोन गोल्ड आणि दोन सिल्व्हर मेडलची कमाई केली आहे. अभिनव बिंद्रा आणि गगन नारंग यांनी 10 मीटर एअर रायफल पेअर प्रकारात गेम्स रेकॉर्डसह गोल्ड पटाकवले. भारताच्या या टॉप जोडीने 1200 पैकी 1193 पॉईंट मिळवत अव्वल क्रमांक पटकावला. गगन नारंगने सहाशेपैकी 598 पॉईंट्स मिळवले. तर अभिनवने 595 पॉईंट्स पटकावले. दोघेही 10 मीटर इन्डिव्हिज्युल स्पर्धेत बुधवारी आमने-सामने असतील.अनिसा आणि राहीची भरारीअभिनव आणि गगन नारंग पाठोपाठ महिलांमध्ये अनिसा सय्यद आणि राही सरनौबतनेही अचूक नेम साधला. 25 मीटर पिस्टल इव्हेंटमध्ये त्यांनी भारताला दुसरे गोल्ड मिळवून दिले. राही सरनोबतची ही पहिलीच कॉमनवेल्थ स्पर्धा आहे. आणि 9.733 चं ऍव्हरेज साधत तिने चांगली कामगिरी केली आहे. दोघींनी मिळून 1156 पॉईंट्सची कमाई केली. या प्रकारात ऑस्ट्रेलियाला सिल्व्हर मेडल मिळाले. त्यांना 1146 पॉईंट्स मिळाले. कॉमनवेल्थ गेम्समध्ये 5 गोल्ड मेडल मिळवत यजमान भारताने आता मेडल टॅलीत थेट दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे. एक नजर टाकूया मेडल टॅलीवर...ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 18 मेडल मिळवलीत आणि ते अव्वल स्थानावर आहेत. यात 8 गोल्ड मेडल, 7 सिल्व्हर मेडल तर 3 ब्राँझ मेडलचा समावेश आहे. भारत या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. भारताने 5 गोल्ड, 4 सिल्व्हर आणि 2 ब्राँझ मेडल मिळवलीत. भारताच्या खात्यात एकूण 11 मेडल्स जमा आहेत.तर इंग्लंडची टीम 9 मेडलसह तिसर्‍या क्रमांकावर आहे. त्यांच्या खात्यात 2 गोल्ड, 4 सिल्व्हर आणि 3 ब्राँझ मेडल जमा आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 5, 2010 05:21 PM IST

पाच 'गोल्ड'ची कमाई...

5 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने कुस्तीत आज तीन गोल्ड मेडल जिंकली. ग्रीको रोमन प्रकारात अनिल कुमार, रविंदर सिंग आणि संजयने गोल्डन कामगिरी केली.

96 किलो वजनी गटात भारताच्या अनिल कुमारने गोल्ड मेडलवर कब्जा केला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या फकेरी हसेनचा पराभव केला. याआधी रविंदरने 60 किलो वजनी गटात भारताला पहिले गोल्ड मेडल जिंकून दिले.

त्याने इंग्लंडच्या टेरेन्स बॉसनचा एकतर्फी लढतीत 7-0 ने पराभव केला. 74 किलो गटात संजयला दक्षिण आफ्रिकेच्या रिचर्ड ऍडिनलने कडवी झुंज दिली. दोन्ही डावात संजयला एक - एक पॉईंट घेता आला. संजयने नेटाने झुंज देत गोल्ड पटकावले.

शूटिंगमधील आगेकूच सुरू

कॉमनवेल्थ स्पर्धेत शूटिंगमध्ये अपेक्षेप्रमाणेच भारताची कामगिरी अव्वल होत आहे. आतापर्यंत पेअर इव्हेंटमध्ये भारताने शूटिंगमध्ये दोन गोल्ड आणि दोन सिल्व्हर मेडलची कमाई केली आहे. अभिनव बिंद्रा आणि गगन नारंग यांनी 10 मीटर एअर रायफल पेअर प्रकारात गेम्स रेकॉर्डसह गोल्ड पटाकवले.

भारताच्या या टॉप जोडीने 1200 पैकी 1193 पॉईंट मिळवत अव्वल क्रमांक पटकावला. गगन नारंगने सहाशेपैकी 598 पॉईंट्स मिळवले. तर अभिनवने 595 पॉईंट्स पटकावले. दोघेही 10 मीटर इन्डिव्हिज्युल स्पर्धेत बुधवारी आमने-सामने असतील.

अनिसा आणि राहीची भरारी

अभिनव आणि गगन नारंग पाठोपाठ महिलांमध्ये अनिसा सय्यद आणि राही सरनौबतनेही अचूक नेम साधला. 25 मीटर पिस्टल इव्हेंटमध्ये त्यांनी भारताला दुसरे गोल्ड मिळवून दिले.

राही सरनोबतची ही पहिलीच कॉमनवेल्थ स्पर्धा आहे. आणि 9.733 चं ऍव्हरेज साधत तिने चांगली कामगिरी केली आहे. दोघींनी मिळून 1156 पॉईंट्सची कमाई केली.

या प्रकारात ऑस्ट्रेलियाला सिल्व्हर मेडल मिळाले. त्यांना 1146 पॉईंट्स मिळाले. कॉमनवेल्थ गेम्समध्ये 5 गोल्ड मेडल मिळवत यजमान भारताने आता मेडल टॅलीत थेट दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे.

एक नजर टाकूया मेडल टॅलीवर...

ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 18 मेडल मिळवलीत आणि ते अव्वल स्थानावर आहेत. यात 8 गोल्ड मेडल, 7 सिल्व्हर मेडल तर 3 ब्राँझ मेडलचा समावेश आहे.

भारत या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. भारताने 5 गोल्ड, 4 सिल्व्हर आणि 2 ब्राँझ मेडल मिळवलीत. भारताच्या खात्यात एकूण 11 मेडल्स जमा आहेत.

तर इंग्लंडची टीम 9 मेडलसह तिसर्‍या क्रमांकावर आहे. त्यांच्या खात्यात 2 गोल्ड, 4 सिल्व्हर आणि 3 ब्राँझ मेडल जमा आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2010 05:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close