S M L

कल्याण-डोंबिवलीत राज्य भ्रष्टाचाराचे

विनय म्हात्रे, कल्याण6 ऑक्टोबरभ्रष्टाचारात अग्रेसर असलेली महापालिका म्हणून कल्याण- डोंबिवली महापालिकेकडे पाहिले जाते. येथील राजकारणी हे फक्त भ्रष्टाचाराचेच वाटेकरी नाहीत, तर ढिसाळ कारभाराचेही वाटेकरी ठरले आहेत.सुनील जोशी या अधिकार्‍याने कल्याण-डोंबिवली महापालिकेला काळिमा फासणारा भ्रष्टाचार केला. यावर कुठल्याही नेत्याने आवाज उठवला नाही. आता विकासाच्या नावावर पुन्हा मते मागायला निघालेली राजकीय मंडळी तरी स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तीला उमेदवारी देणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.तरुण, अभ्यासू आणि उच्चशिक्षित उमेदवारांची रांग सगळ्याच पक्षात लागली आहे. पण भ्रष्टाचाराचा शिक्का बसलेल्या नेत्यांना या निवडणुकीत वगळण्याचे धाडस कोण करणार हाच मुळी उत्सुकतेचा भाग आहे.मागील 5 वर्षे मतदारांकडे पाठ फिरवणारे राजकीय पक्ष आता चिंतेत आहेत. कारण त्यांच्या भविष्याची चावी आता मतदारांच्या हाती आहे. म्हणूनच सर्वच राजकीय पक्ष मतदारांना भावणारा उमेदवार देण्याचा प्रयत्न करीत आहेत.कल्याण-डोंबिवलीच्या रणांगणात यावेळी पहिल्यांदाच मनसेचे रेल्वे इंजीन धावणार आहे. मनसे उमेदवारांची निवड कशी करणार हेही पाहावे लागणार आहे.महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये साटेलोटे असल्याची चर्चा गेल्या पाच वर्षांपासून ऐकायला मिळत आहे. याचा फायदा अधिकार्‍यांनी घेतल्याचेही बोलले जात. या अधिकार्‍यांवर वचक ठेवून स्वच्छ कारभार करणारे नगरसेवक निवडून यावेत, अशी अपेक्षा सर्वसामान्य मतदार व्यक्त करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 6, 2010 10:59 AM IST

कल्याण-डोंबिवलीत राज्य भ्रष्टाचाराचे

विनय म्हात्रे, कल्याण

6 ऑक्टोबर

भ्रष्टाचारात अग्रेसर असलेली महापालिका म्हणून कल्याण- डोंबिवली महापालिकेकडे पाहिले जाते. येथील राजकारणी हे फक्त भ्रष्टाचाराचेच वाटेकरी नाहीत, तर ढिसाळ कारभाराचेही वाटेकरी ठरले आहेत.

सुनील जोशी या अधिकार्‍याने कल्याण-डोंबिवली महापालिकेला काळिमा फासणारा भ्रष्टाचार केला. यावर कुठल्याही नेत्याने आवाज उठवला नाही. आता विकासाच्या नावावर पुन्हा मते मागायला निघालेली राजकीय मंडळी तरी स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तीला उमेदवारी देणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

तरुण, अभ्यासू आणि उच्चशिक्षित उमेदवारांची रांग सगळ्याच पक्षात लागली आहे. पण भ्रष्टाचाराचा शिक्का बसलेल्या नेत्यांना या निवडणुकीत वगळण्याचे धाडस कोण करणार हाच मुळी उत्सुकतेचा भाग आहे.

मागील 5 वर्षे मतदारांकडे पाठ फिरवणारे राजकीय पक्ष आता चिंतेत आहेत. कारण त्यांच्या भविष्याची चावी आता मतदारांच्या हाती आहे. म्हणूनच सर्वच राजकीय पक्ष मतदारांना भावणारा उमेदवार देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कल्याण-डोंबिवलीच्या रणांगणात यावेळी पहिल्यांदाच मनसेचे रेल्वे इंजीन धावणार आहे. मनसे उमेदवारांची निवड कशी करणार हेही पाहावे लागणार आहे.

महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये साटेलोटे असल्याची चर्चा गेल्या पाच वर्षांपासून ऐकायला मिळत आहे. याचा फायदा अधिकार्‍यांनी घेतल्याचेही बोलले जात.

या अधिकार्‍यांवर वचक ठेवून स्वच्छ कारभार करणारे नगरसेवक निवडून यावेत, अशी अपेक्षा सर्वसामान्य मतदार व्यक्त करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2010 10:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close