S M L

गांधी स्मारक जमिनीबाबत मनसेने मागितला खुलासा

6 ऑक्टोबर पुण्यातील महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या मालकीच्या जमिनीपैकी एक एकर जमीन बिल्डरला दिल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ट्रस्टच्या विश्वस्तांकडे खुलासा मागितला आहे.  ट्रस्टच्या भाडेकरूंनाही त्रास दिल्याचा आरोप भाडेकरू आणि मनसेने केला आहे.  ट्रस्टचे सध्याचे प्रमुख विश्वस्त कुमार सप्तर्षी यांनी सर्व आरोप फेटाळून लावत ठाकरे यांनाच खोटी माहीती देणार्‍यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.  पुण्यातील कोथरूड परिसरात महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या मालकीची 11 एकर 7 गुंठे जमीन आहे.  गांधी स्मारक निधी, राजघाट नवी दिल्ली यांच्याकडे या जमिनीची मूळ मालकी हक्क होते. या जागेवर गांधी भवन ही इमारत आहे.  दिवंगत गांधीवादी नेते बाळासाहेब भारदे ट्रस्टचे अध्यक्ष असताना एक एकर जमीन रोहन बिल्डर्सला देण्यात आली.  उरलेल्या जागेवर स्मॉल स्केल इंडस्ट्री, निसर्गोपचार केंद्र आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ट्रस्टने बिल्डरशी केलेल्या व्यवहाहाराला तसेच भाडेकरूंसोबतच्या वागणुकीला आक्षेप घेतला आहे.  काही भाडेकरूंनीही भाडेवाढीला नकार दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 6, 2010 12:38 PM IST

गांधी स्मारक जमिनीबाबत मनसेने मागितला खुलासा

6 ऑक्टोबर

 

पुण्यातील महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या मालकीच्या जमिनीपैकी एक एकर जमीन बिल्डरला दिल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ट्रस्टच्या विश्वस्तांकडे खुलासा मागितला आहे.

 

ट्रस्टच्या भाडेकरूंनाही त्रास दिल्याचा आरोप भाडेकरू आणि मनसेने केला आहे.

 

ट्रस्टचे सध्याचे प्रमुख विश्वस्त कुमार सप्तर्षी यांनी सर्व आरोप फेटाळून लावत ठाकरे यांनाच खोटी माहीती देणार्‍यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

 

पुण्यातील कोथरूड परिसरात महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या मालकीची 11 एकर 7 गुंठे जमीन आहे.

 

गांधी स्मारक निधी, राजघाट नवी दिल्ली यांच्याकडे या जमिनीची मूळ मालकी हक्क होते. या जागेवर गांधी भवन ही इमारत आहे.

 

दिवंगत गांधीवादी नेते बाळासाहेब भारदे ट्रस्टचे अध्यक्ष असताना एक एकर जमीन रोहन बिल्डर्सला देण्यात आली.

 

उरलेल्या जागेवर स्मॉल स्केल इंडस्ट्री, निसर्गोपचार केंद्र आहे.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ट्रस्टने बिल्डरशी केलेल्या व्यवहाहाराला तसेच भाडेकरूंसोबतच्या वागणुकीला आक्षेप घेतला आहे.

 

काही भाडेकरूंनीही भाडेवाढीला नकार दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2010 12:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close