S M L

भारताच्या खात्यात 11 गोल्ड

6 ऑक्टोबर कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने 11व्या गोल्ड मेडलची नोंद केली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला दुसरे गोल्ड मेडल मिळाले आहे. 69 किलो वजनी गटात भारताच्या रवि कुमारने गोल्ड मेडल पटकावले. रवि कुमारने फायनलमध्ये 175 किलो वजन उचलत कॉमनवेल्थ गेम्समध्ये नवा रेकॉर्डही केला. 55 किलो वजनी गटात भारताच्या राजेंदर कुमारने गोल्ड मेडल जिंकले आहे. ग्रीको रोमन प्रकारात त्याने पाकिस्तानच्या कुस्तीपटूचा पराभव केला. कुस्तीत आता भारताच्या खात्यात एकूण 4 गोल्ड मेडलची नोंद झाली आहे. पहिले सिल्व्हरही खात्यातकुस्तीत भारताच्या खात्यात आज पहिल्या सिल्व्हर मेडलची नोंद झाली. 84 किलो वजनी गटात भारताच्या मनोज कुमारने सिल्व्हर मेडल पटकावले. नायजेरियाच्या अग्वानाबारेने फायनलमध्ये त्याचा पराभव केला.ब्राँझची कमाईदुसरीकडे 66 किलो वजनी गटात भारताच्या सुनील कुमारने ब्राँझ मेडल पटकावले. सुनील कुमारने वेल्सच्या ब्रेट हाऊथ्रॉनचा 6-0, 8-0 असा एकतर्फी पराभव केला. बॉक्सिंगमध्येही चांगली कामगिरीबॉक्सिंगमध्येही भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगली होत आहे. भारताच्या जय भगवानने दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. 60 किलो वजनी गटात भगवानने नैरुच्या कॅलेब कोलानचा 9-1 असा सहज पराभव केला. वेट लिफ्टिंगमध्ये गोल्डवेटलिफ्टिंगमध्येही भारताने गोल्ड मेडलची नोंद केली. महिलांच्या 58 किलो वजनी गटात भारताच्या रेणू बाला चानूने गोल्ड मेडलची नोंद केली. चानूने 197 किलो वजन उचलले. वेटलिफ्टिंगमध्ये भारताने पहिले गोल्ड मेडल पटकावले. तर एकूण 9 गोल्ड मेडलची कमाई केली आहे.सानिया क्वार्टर फायनलमध्ये टेनिसमध्ये सानिया मिर्झाने क्वार्टरफायनलमध्ये धडक मारली आहे. टेनिसच्या दुसर्‍या राऊंडमध्ये सानियाने आयर्लंडच्या तेयी ब्रीटनीचा 6-0, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. आता क्वार्टर फायनलमध्ये सानियाचा मुकाबला न्यूझीलंडच्या इराकोव्हीक मरीनाशी होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 6, 2010 01:12 PM IST

भारताच्या खात्यात 11 गोल्ड

6 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने 11व्या गोल्ड मेडलची नोंद केली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला दुसरे गोल्ड मेडल मिळाले आहे.

69 किलो वजनी गटात भारताच्या रवि कुमारने गोल्ड मेडल पटकावले. रवि कुमारने फायनलमध्ये 175 किलो वजन उचलत कॉमनवेल्थ गेम्समध्ये नवा रेकॉर्डही केला.

55 किलो वजनी गटात भारताच्या राजेंदर कुमारने गोल्ड मेडल जिंकले आहे.

ग्रीको रोमन प्रकारात त्याने पाकिस्तानच्या कुस्तीपटूचा पराभव केला. कुस्तीत आता भारताच्या खात्यात एकूण 4 गोल्ड मेडलची नोंद झाली आहे.

पहिले सिल्व्हरही खात्यात

कुस्तीत भारताच्या खात्यात आज पहिल्या सिल्व्हर मेडलची नोंद झाली.

84 किलो वजनी गटात भारताच्या मनोज कुमारने सिल्व्हर मेडल पटकावले.

नायजेरियाच्या अग्वानाबारेने फायनलमध्ये त्याचा पराभव केला.

ब्राँझची कमाई

दुसरीकडे 66 किलो वजनी गटात भारताच्या सुनील कुमारने ब्राँझ मेडल पटकावले.

सुनील कुमारने वेल्सच्या ब्रेट हाऊथ्रॉनचा 6-0, 8-0 असा एकतर्फी पराभव केला.

बॉक्सिंगमध्येही चांगली कामगिरी

बॉक्सिंगमध्येही भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगली होत आहे. भारताच्या जय भगवानने दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे.

60 किलो वजनी गटात भगवानने नैरुच्या कॅलेब कोलानचा 9-1 असा सहज पराभव केला.

वेट लिफ्टिंगमध्ये गोल्ड

वेटलिफ्टिंगमध्येही भारताने गोल्ड मेडलची नोंद केली. महिलांच्या 58 किलो वजनी गटात भारताच्या रेणू बाला चानूने गोल्ड मेडलची नोंद केली.

चानूने 197 किलो वजन उचलले. वेटलिफ्टिंगमध्ये भारताने पहिले गोल्ड मेडल पटकावले.

तर एकूण 9 गोल्ड मेडलची कमाई केली आहे.

सानिया क्वार्टर फायनलमध्ये

टेनिसमध्ये सानिया मिर्झाने क्वार्टरफायनलमध्ये धडक मारली आहे.

टेनिसच्या दुसर्‍या राऊंडमध्ये सानियाने आयर्लंडच्या तेयी ब्रीटनीचा 6-0, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.

आता क्वार्टर फायनलमध्ये सानियाचा मुकाबला न्यूझीलंडच्या इराकोव्हीक मरीनाशी होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2010 01:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close