S M L

हरित सेना उपक्रमाला नोटीस

दीप्ती राऊत, नाशिक 6 ऑक्टोबरपर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी राज्य सरकारने गणेशोत्सवात हरित सेनेची योजना राबवली. दुसरीकडे सरकारच्या अधिकार्‍यांनीच या उपक्रमाबद्दल शाळांना नोटीसा पाठवल्या आहेत. नाशिकच्या शिक्षणाधिकार्‍यांनी पाठवलेल्या या नोटीशीमुळे आता शिक्षणमंत्रीच अडचणीत आले आहेत. नाशिकच्या रचना आणि नवरचना शाळा दरवर्षी प्रदूषण मुक्त गणेशोत्सवाची मोहीम राबवतात. यंदा त्यांना तो उपक्रम बंद करावा लागला. कारण शिक्षणाधिकार्‍यांनी पाठवलेले ताकीद पत्र...खरे तर मूर्ती दानाचा उपक्रम पर्यावरण शिक्षणाचा भाग म्हणून पाहिला गेला. मात्र नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्‍यांनी हा उपक्रम राबवणार्‍या शाळांना ताकीदवजा इशारा दिला आहे, की तुमच्या मान्यतेचा फेरविचार का करण्यात येऊ नये?हरित सेना उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना पर्यावरणाबाबत जागरूक केले जाते. मात्र नाशिकच्या शिक्षणाधिकार्‍यांना हे धार्मिक काम वाटत आहे.मात्र, प्रयोगशील शिक्षणाच्या भूमिकेतूनच शाळांनी हा उपक्रम राबवला आहे, असे शाळांचे म्हणणे आहे.शिक्षणाधिकार्‍यांच्या या ताकीद पत्रानं शिक्षण मंत्रीच अडचणीत आले आहेत. एकीकडे सरकारने पर्यावरण रक्षणासाठी शाळांमधून हरित सेना तयार करायची आणि दुसरीकडे हे उपक्रम राबवणार्‍या शाळांना शासनाच्याच शिक्षणाधिकार्‍यांनी ताकीद द्यायची, असा आडमुठा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 6, 2010 01:20 PM IST

हरित सेना उपक्रमाला नोटीस

दीप्ती राऊत, नाशिक

6 ऑक्टोबर

पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी राज्य सरकारने गणेशोत्सवात हरित सेनेची योजना राबवली.

दुसरीकडे सरकारच्या अधिकार्‍यांनीच या उपक्रमाबद्दल शाळांना नोटीसा पाठवल्या आहेत.

नाशिकच्या शिक्षणाधिकार्‍यांनी पाठवलेल्या या नोटीशीमुळे आता शिक्षणमंत्रीच अडचणीत आले आहेत.

नाशिकच्या रचना आणि नवरचना शाळा दरवर्षी प्रदूषण मुक्त गणेशोत्सवाची मोहीम राबवतात.

यंदा त्यांना तो उपक्रम बंद करावा लागला. कारण शिक्षणाधिकार्‍यांनी पाठवलेले ताकीद पत्र...

खरे तर मूर्ती दानाचा उपक्रम पर्यावरण शिक्षणाचा भाग म्हणून पाहिला गेला.

मात्र नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्‍यांनी हा उपक्रम राबवणार्‍या शाळांना ताकीदवजा इशारा दिला आहे, की तुमच्या मान्यतेचा फेरविचार का करण्यात येऊ नये?

हरित सेना उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना पर्यावरणाबाबत जागरूक केले जाते. मात्र नाशिकच्या शिक्षणाधिकार्‍यांना हे धार्मिक काम वाटत आहे.

मात्र, प्रयोगशील शिक्षणाच्या भूमिकेतूनच शाळांनी हा उपक्रम राबवला आहे, असे शाळांचे म्हणणे आहे.

शिक्षणाधिकार्‍यांच्या या ताकीद पत्रानं शिक्षण मंत्रीच अडचणीत आले आहेत.

एकीकडे सरकारने पर्यावरण रक्षणासाठी शाळांमधून हरित सेना तयार करायची आणि दुसरीकडे हे उपक्रम राबवणार्‍या शाळांना शासनाच्याच शिक्षणाधिकार्‍यांनी ताकीद द्यायची, असा आडमुठा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2010 01:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close