S M L

फसवणूक करून किडनी काढल्याचा आरोप

6 ऑक्टोबरफसवणूक करून किडनी काढल्याचा आरोप करत पुण्यामध्ये एका डॉक्टरविरोधात तक्रार नोंदवली आहे. तर पेशंटच्या नातेवाईकांनी दमदाटी केल्याचा आरोप डॉक्टरने केला आहे. पुण्याजवळच्या देहू गावात राहणार्‍या विजया काळोखे यांना किडनी स्टोनचा त्रास होऊ लागल्याने 16 सप्टेंबरला पुण्याच्या नारायण पेठेतील डॉ. अशोक लाठी यांच्या दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले. दुसर्‍या दिवशी ऑपरेशमध्ये पेशटंची नस तुटल्याने रक्तस्राव होऊ लागला. त्यामुळे किडनी काढून टाकावी लागेल, असे डॉ. लाठींनी नातेवाईकांना सांगितले. तसे अंडरटेकींग लिहून घेतले. मात्र डॉक्टरांनी गरज नसताना किडनी काढल्याचा आरोप पेशंटच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळेच डॉक्टरांनी भरपाई देण्याचे कबूल केल्याचे पेशंटच्या नातेवाईकांनी सांगितले. तर पेशंटच्या नातेवाईकांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याने आपण तसे कबूल केल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 6, 2010 01:56 PM IST

फसवणूक करून किडनी काढल्याचा आरोप

6 ऑक्टोबर

फसवणूक करून किडनी काढल्याचा आरोप करत पुण्यामध्ये एका डॉक्टरविरोधात तक्रार नोंदवली आहे.

तर पेशंटच्या नातेवाईकांनी दमदाटी केल्याचा आरोप डॉक्टरने केला आहे.

पुण्याजवळच्या देहू गावात राहणार्‍या विजया काळोखे यांना किडनी स्टोनचा त्रास होऊ लागल्याने 16 सप्टेंबरला पुण्याच्या नारायण पेठेतील डॉ. अशोक लाठी यांच्या दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले.

दुसर्‍या दिवशी ऑपरेशमध्ये पेशटंची नस तुटल्याने रक्तस्राव होऊ लागला.

त्यामुळे किडनी काढून टाकावी लागेल, असे डॉ. लाठींनी नातेवाईकांना सांगितले.

तसे अंडरटेकींग लिहून घेतले. मात्र डॉक्टरांनी गरज नसताना किडनी काढल्याचा आरोप पेशंटच्या नातेवाईकांनी केला आहे.

त्यामुळेच डॉक्टरांनी भरपाई देण्याचे कबूल केल्याचे पेशंटच्या नातेवाईकांनी सांगितले.

तर पेशंटच्या नातेवाईकांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याने आपण तसे कबूल केल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2010 01:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close