S M L

सचिनला क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्कार

6 ऑक्टोबर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.बंगलोरमध्ये आज 2010 साठीच्या आयसीसी ऍवॉर्डची घोषणा करण्यात आली. टेस्ट आणि वन डे क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करणार्‍या सचिन तेंडुलकरला हा पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर पिपल्स चॉईस अवॉर्डही सचिनलाच देण्यात आला. भारताचा धडाकेबाज ओपनर वीरेंद्र सेहवागने टेस्ट क्रिकेटमधील सर्वाेत्कृष्ट खेळाडूचा मान पटकावला. सेहवागने या वर्षांत 10 टेस्ट मॅचमध्ये एक हजार 282 रन्स केलेत. त्यात 6 सेंच्युरी आणि चार हाफ सेंच्युरीजचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स वन डे प्लेअर ऑफ द इयर चा पुरस्कार मिळाला. या गटात सचिन आणि सेहवागला नामांकन मिळाले होते. तर न्यूझिलंडच्या ब्रॅण्डम मॅक्युलमला ट्वेण्टी-20 मधील सर्वाेकृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे.न्यूझिलंड टीमला स्पिरिट ऑफ क्रिकेटचा पुरस्कार मिळाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 6, 2010 02:03 PM IST

सचिनला क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्कार

6 ऑक्टोबर

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

बंगलोरमध्ये आज 2010 साठीच्या आयसीसी ऍवॉर्डची घोषणा करण्यात आली. टेस्ट आणि वन डे क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करणार्‍या सचिन तेंडुलकरला हा पुरस्कार देण्यात आला.

त्याचबरोबर पिपल्स चॉईस अवॉर्डही सचिनलाच देण्यात आला. भारताचा धडाकेबाज ओपनर वीरेंद्र सेहवागने टेस्ट क्रिकेटमधील सर्वाेत्कृष्ट खेळाडूचा मान पटकावला.

सेहवागने या वर्षांत 10 टेस्ट मॅचमध्ये एक हजार 282 रन्स केलेत. त्यात 6 सेंच्युरी आणि चार हाफ सेंच्युरीजचा समावेश आहे.

दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स वन डे प्लेअर ऑफ द इयर चा पुरस्कार मिळाला.

या गटात सचिन आणि सेहवागला नामांकन मिळाले होते. तर न्यूझिलंडच्या ब्रॅण्डम मॅक्युलमला ट्वेण्टी-20 मधील सर्वाेकृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे.

न्यूझिलंड टीमला स्पिरिट ऑफ क्रिकेटचा पुरस्कार मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2010 02:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close