S M L

कर्नाटकात राजकीय पेच वाढला

7 ऑक्टोबरकर्नाटकमध्ये राजकीय पेच निर्माण झालाय. 14 बंडखोर आमदार गोव्याला गेलेत. काही आमदारांची समजूत काढण्यात कर्नाटकचे पर्यटनमंत्री जनार्दन रेड्डी यांना यश आल्याचे समजते. उद्यापर्यंत हे आमदार बंगळुरूला परतण्याची शक्यता आहे. धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा आणि त्यांचा मुलगा एच. डी. कुमारस्वामी यांनी या आमदारांना बंडखोरीसाठी फूस दिली होती. पण काँग्रेसने त्यांच्यासोबत सरकार स्थापण करण्यास नकार दिल्याने गौडा पितापुत्रांचा डाव फसला आहे. कर्नाटकात सत्ता ताब्यात घेण्यासाठी संघर्ष टोकाला गेला आहे. एका बाजूला आहेत बेल्लारीतील मायनिंग सम्राट रेड्डी बंधू. भाजपची कर्नाटकातील पैशांची खाण म्हणून ते ओळखले जातात. तर दुसर्‍या बाजूला आहेत, एच. डी. कुमारस्वामी. माजी मुख्यमंत्री आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांचे पुत्र. दोन्ही बाजू पैसेवाल्या आहेत. आणि एकमेकांच्या आमदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या रस्सीखेचीत सापडलेत मुख्यमंत्री येडियुरप्पा. आपले सरकार वाचवण्यासाठी आता त्यांनी रेड्डी बंधूंच्या पैशांच्या ताकदीवर मदार ठेवली आहे.काळजीत पडलेल्या मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण दिवस केरळमधील एका मंदिरात घालवला. सरकार वाचवण्याची जबाबदारी रेड्डी बंधूंवर टाकून ते देवाचा धावा करत आहेत. तर कालपर्यंत सरशी झाल्याच्या आनंदात असणारे कुमारस्वामंी आता मात्र फारसे कॉन्फिडंट दिसत नाहीत.दोन्ही बाजू बंडखोर भाजप आणि अपक्ष आमदारांना आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नात आहेत. हे आमदार गेल्या दोन दिवसांपासून या हॉटेलातून त्या हॉटेलात फिरत आहेत. आणि प्रत्येकाला आडाखे बांधण्याची संधी देत आहेत.या आमदारांच्या पाठिंब्याशिवाय येडियुरप्पा सरकार अल्पमतात येईल. पण भाजपचे सरकार वाचण्याची एक आशा आहे, ती म्हणजे गौडा पिता-पुत्राच्या भरवशावर सरकार स्थापन करायला काँग्रेसची असलेली अनिच्छा...गेल्या पाच वर्षांत कर्नाटकातल्या सरकारने पाहिलेला हा पहिलाच पेचप्रसंग नाही. राजकारणावर अर्थकारणाचा प्रभाव असल्याने मोठ्या रकमेपोटी आमदार सहज उपलब्ध होतात. आणि त्यामुळेच येडियुरप्पांचे सरकार अधांतरी लटकत आहे.आमदार मुंबईतयेडीयुरप्पा सरकारला अडचणीत आणणारे भाजपचे 12 बंडखोर आमदार बुधवारी रात्री मुंबईत आले होते. त्यावेळी एअरपोर्टवर त्यांना ताब्यात घेण्याची महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची योजना होती. पण सकाळीच हे आमदार गोव्याला निघून गेल्यामुळे ही योजना फसली. कर्नाटकातील संख्याबळावर नजर टाकूया - एकूण जागा - 224बहुमतासाठी आवश्यक संख्या - 113 भाजप + अपक्ष - 123 विरोधी पक्ष - 101 बंडखोरांनी पाठिंबा काढला तर - भाजप - 103विरोधी पक्ष - 101बंडखोर - 20

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 7, 2010 12:43 PM IST

कर्नाटकात राजकीय पेच वाढला

7 ऑक्टोबर

कर्नाटकमध्ये राजकीय पेच निर्माण झालाय. 14 बंडखोर आमदार गोव्याला गेलेत. काही आमदारांची समजूत काढण्यात कर्नाटकचे पर्यटनमंत्री जनार्दन रेड्डी यांना यश आल्याचे समजते. उद्यापर्यंत हे आमदार बंगळुरूला परतण्याची शक्यता आहे.

धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा आणि त्यांचा मुलगा एच. डी. कुमारस्वामी यांनी या आमदारांना बंडखोरीसाठी फूस दिली होती. पण काँग्रेसने त्यांच्यासोबत सरकार स्थापण करण्यास नकार दिल्याने गौडा पितापुत्रांचा डाव फसला आहे.

कर्नाटकात सत्ता ताब्यात घेण्यासाठी संघर्ष टोकाला गेला आहे. एका बाजूला आहेत बेल्लारीतील मायनिंग सम्राट रेड्डी बंधू. भाजपची कर्नाटकातील पैशांची खाण म्हणून ते ओळखले जातात. तर दुसर्‍या बाजूला आहेत, एच. डी. कुमारस्वामी. माजी मुख्यमंत्री आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांचे पुत्र. दोन्ही बाजू पैसेवाल्या आहेत.

आणि एकमेकांच्या आमदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या रस्सीखेचीत सापडलेत मुख्यमंत्री येडियुरप्पा. आपले सरकार वाचवण्यासाठी आता त्यांनी रेड्डी बंधूंच्या पैशांच्या ताकदीवर मदार ठेवली आहे.

काळजीत पडलेल्या मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण दिवस केरळमधील एका मंदिरात घालवला. सरकार वाचवण्याची जबाबदारी रेड्डी बंधूंवर टाकून ते देवाचा धावा करत आहेत. तर कालपर्यंत सरशी झाल्याच्या आनंदात असणारे कुमारस्वामंी आता मात्र फारसे कॉन्फिडंट दिसत नाहीत.

दोन्ही बाजू बंडखोर भाजप आणि अपक्ष आमदारांना आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नात आहेत. हे आमदार गेल्या दोन दिवसांपासून या हॉटेलातून त्या हॉटेलात फिरत आहेत. आणि प्रत्येकाला आडाखे बांधण्याची संधी देत आहेत.

या आमदारांच्या पाठिंब्याशिवाय येडियुरप्पा सरकार अल्पमतात येईल. पण भाजपचे सरकार वाचण्याची एक आशा आहे, ती म्हणजे गौडा पिता-पुत्राच्या भरवशावर सरकार स्थापन करायला काँग्रेसची असलेली अनिच्छा...

गेल्या पाच वर्षांत कर्नाटकातल्या सरकारने पाहिलेला हा पहिलाच पेचप्रसंग नाही. राजकारणावर अर्थकारणाचा प्रभाव असल्याने मोठ्या रकमेपोटी आमदार सहज उपलब्ध होतात. आणि त्यामुळेच येडियुरप्पांचे सरकार अधांतरी लटकत आहे.

आमदार मुंबईत

येडीयुरप्पा सरकारला अडचणीत आणणारे भाजपचे 12 बंडखोर आमदार बुधवारी रात्री मुंबईत आले होते. त्यावेळी एअरपोर्टवर त्यांना ताब्यात घेण्याची महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची योजना होती. पण सकाळीच हे आमदार गोव्याला निघून गेल्यामुळे ही योजना फसली.

कर्नाटकातील संख्याबळावर नजर टाकूया -

एकूण जागा - 224

बहुमतासाठी आवश्यक संख्या - 113

भाजप अपक्ष - 123

विरोधी पक्ष - 101

बंडखोरांनी पाठिंबा काढला तर -

भाजप - 103

विरोधी पक्ष - 101

बंडखोर - 20

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 7, 2010 12:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close